आठवडा विशेष | ज्ञानेश्वर धोंडू पाटील
सोयगाव दि.०८:दुष्काळाच्या अंतिम टप्प्यात पाण्याच्या दह्कातेने तब्बल ७० गावे होरपळत असतांना सोयगाव तालुक्याला केवळ पाच गावांना दहा टँकरवर तब्बल २३ हजार नागरिकांना तहान भागवावी लागत आहे.दरम्यान उर्वरित ६५ गावांना पाण्याच्या उपाय योजनेसाठी अद्यापही प्रशासन उदासीन असल्याचे चित्र असल्याने पिण्याच्या पाण्याची वणवण सोयगाव तालुकावासियाच्या पाचवीला पुंजली आहे.
तालुक्यात ७० गावे महिनाभरापासून पिण्याच्या पाण्यासाठी होरपळली असतांना पंचायत समितीच्या विभागाकडून पाठविण्यात आलेले प्रस्ताव मंजुरीविना परत येत असतांना काही गावांना मुख्यालयी तलाठी आणि ग्रामसेवक हजर राहत नसल्याने पाणीटंचाईचा गोंधळ उडाला आहे.दरम्यान तालुका प्रशासनाकडून केवळ वाकडी.उमरविहीरे,फर्दापूर,टिटवी,पळसखेडा या पाच गावांना टँकर मंजुरी देण्यात आली असून उर्वरित गावांची पाणी टंचाई कागदोपत्री फिरत असल्याचे चित्र आहे.काही गावांच्या टंचाई आराखडे सुद्ध दाखल करण्यात आलेले नसून ग्रामसेवकांकडून प्रस्तावच दाखल करण्यात येत नसल्याचा खळबळजनक प्रकार गुरुवारी उघडकीस आला आहे.दरम्यान पंचायत समितीच्या संबंधित विभागाकडून याबाबत पाठपुरावा करण्यात अपयश येत असल्याने सोयगाव तालुक्यातील पाणीटंचाई गंभीर झाली आहे.गावांची स्थिती गंभीर झाली असतांना प्रशासनाकडून मात्र डोळेझाक करण्यात येत असल्याचा आरोप तहानेने व्याकूळ झालेल्या ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.
मंजूर झालेल्या टँकरमध्ये जनावरांचाही समावेश-
दरम्यान टँकर मंजूर झालेल्या गावातील जनावरांचीही संख्या प्रस्तावावर नमूद करण्यात आली असल्याने जनावरे आणि ग्रामस्थ अडे मिळून एक टँकर या टँकरची पाण्याची क्षमता केवळ बारा हजार लिटर्स असल्याने गावात आलेले पाणी जनावरांनी प्यायचे कि ग्रामस्द्थांनी असा प्रश्न निर्माण झाला आहे.
गावनिहाय मंजूर झालेले टँकर व फेऱ्या-
वाकडी-एक टँकर-क्षमता-बारा हजार लिटर्स
उमरविहीरे एक टँकर-क्षमता-बारा हजार लिटर्स
टिटवी-एक टँकर-क्षमता-बारा हजार लिटर्स
पळसखेडा-एक टँकर-क्षमता-बारा हजार लिटर्स
फर्दापूर-सहा टँकर-बारा फेऱ्या याप्रमाणे सोयगाव तालुक्यात टँकरनिहाय स्थिती आहे.