औरंगाबाद : मुख्यमंत्री संवाद उपक्रम,सोयगाव तालुक्याच्या दुष्काळाच्या दाहकतेचा सात सरपंचाकडून घेतला आढावा

आठवडा विशेष | ज्ञानेश्वर धोंडू पाटील

सोयगाव दि.८: सोयगाव तालुक्याच्या दुष्काळाच्या वेदना समजून घेण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी सोयगाव तालुक्यातील मूळ प्रतिनिधीशी थेट मोबाईलवरून संपर्क साधून उपाय योजना संबंधी चर्चा करून आगामी काळात करावयाच्या विकासाबाबत चर्चा केल्याने सोयगाव तालुक्यातील सात सरपंचाना मंत्रालयात बसले असल्याचा जणूकाही भासच झाला होता.या उपक्रमात सोयगाव तालुक्यातील सात ग्रामपंचायतींच्या सरपंचाना संधी मिळाली असून यामध्ये पाच महिला सरपंचाचा समावेश होता.
सुरेखा तायडे(गलवाडा),छाया मगर(पहुरी)मुन्नाबी खाटिक(बनोटी),ताराबाई राठोड(निंबायती),राजेंद्र परदेशी(मोहलाई)मनीषा शिंदे(वरठाण),समाधान तायडे(जरंडी)राधेशाम जाधव(जामठी)या सरपंचाना संधी मिळाली असून यामध्ये पहिली संधी गलवाडा सरपंच सुरेखा तायडे यांना मिळाली,यामध्ये सुरेखा तायडे यांनी अजिंठ्याच्या डोंगराच्या कुशीत वसलेल्या गलवाडा गावाला पाण्याची चणचण भासत असून या गावाला केवळ ६० हजार लिटर क्षमतेची साठवण पुरवठा टाकी असल्याने पाणीटंचाई भासत असून टंचाईग्रस्त निधीतून तरतूद करून नव्याने साठवण टाकी मंजूर करून द्यावी आणि त्यासोबतच गावासाठी भविष्यात पाणीटंचाई भासणार नाही यासाठी राष्ट्रीय पेयजल योजना मंजूर करावी अशी मागणी केली असता मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी तातडीने टोलफ्री कॉलवर असलेल्या अधिकार्यांना गुउवारी पाहणी करून अहवाल देण्याच्या सूचना केल्या त्यामुळे सरपंच सुरेखा तायडे यांना गुरुवारी संबंधित विभागाकडे अर्ज करण्याच्या सूचनाही केल्याने गलवाडा गावाचे भविष्य उज्ज्वल झाले आहे.
Get it on Google Play
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गलवाडा गावाला विकासाचे रोल मॉडेल करण्याचे आश्वासनही सरपंच यांना दिले.पहुरीच्या सरपंच छाया मगर यांनी पीकविम्याचा प्रश्न उपस्थित करून परिसरात शेतकऱ्यांना वीस टक्केच पीकविमा मंजूर झाला असल्याच्या तक्रारीवरून तातडीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित कंपन्यांना तातडीने नोटीसा बजाविण्याच्या सूचना केल्या आहे.निंबायती सरपंच ताराबाई राठोड यांनी गावासाठी पिण्याच्या पाण्याची मोठी टंचाई निर्माण झाली असून पुरवठा होणाऱ्या धिंगापूर धरणात थेट वीज पंप सोडून गावाला वापरण्याइतपत पाणी पुरवठा करण्यात येत असल्याने धरणात नवीन विहीर खोदण्यासाठी परवानगी देवून निधीची तरतूद करण्याची मागणी केल्यावरून याबाबतही पाणी पुरवठा विभागाला सूचना दिल्या.वर्थान गावालाही पेयजल योजनेतून प्रस्ताव मंजूर करून नालाखोलीकरण करण्याच्या सूचना मनीषा शिंदे यांच्या मागणीवरून करण्यात आल्याने तालुक्यातील विकासाला या उपक्रमातून चालना मिळाली आहे.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.