सोयगाव :ज्ञानेश्वर धोंडू पाटील― ग्रामपंचायतीच्या निवडणुका जाहीर होताच व आचार संहिता शुक्रवारपासून लागू होताच सोयगावला सोमवारी(दि.१४)यंत्रणांच्या विभागप्रमुखांची आचारसंहिता बैठक आयोजित करण्यात आली असून बुधवारी ४८ निवडणूक निर्णय अधिकारी व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांची ग्रामपंचायत निवडणुका निवडणुकांच्या अनुषंगाने पहिले प्रशिक्षण आयोजित करण्यात आल्याची माहिती तहसीलदार प्रवीण पांडे यांनी दिली.
ग्रामपंचायतीच्या निवडणुका लागू झाल्या आहे दि.१५ जानेवारीला मतदान होत असून यासाठी दि.२३ डिसेंबर ते ३० डिसेंबर पर्यंत नामनिर्देशनपत्र दाखल करण्याबाबतच्या सूचना प्राप्त होताच सोमवारी सोयगाव तहसील कार्यालयात आचारसंहिता पूर्व बैठक आयोजित करून बुधवारी दि.१६ निवडणूक निर्णय अधिकारी यांचे पहिले निवडणूक प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे.त्यापूर्वी दि.१४ डिसेंबरला चाळीस ग्रामपंचायतींची अंतिम मतदार यादी ग्रामपंचायतीवर प्रसिद्ध करण्यात येणार आहे.ग्रामपंचायती निवडणुकांचा कार्यक्रम घोषित होताच तालुका प्रशासनाच्या वतीने शुक्रवारी दुपारपासूनच आचार संहितेची अंमलबजावणी करण्याबाबतचं सूचना तहसीलदार प्रवीण पांडे यांनी काढल्या आहे.
सोयगाव तालुक्यात चाळीस ग्रामपंचायतींच्या निवडणुका-
सोयगाव तालुक्यात चाळीस ग्रामपंचायतींच्या निवडणुका होवू घातल्या असून त्यासाठीचे सरपंचपदाचे आरक्षण सोडतहीजाहीर करण्यात आलेली आहे.त्यामुळे ग्रामीण भागात निवडणुकांचा बिगुल वाजला असून राजकीय वातावरण शुक्रवार पासून तापले आहे.
ग्रामपंचायातीच्या निवडणुकांसाठी समन्वय अधिकारी गटविकास अधिकारी व क्षेत्रीय अधिकारी विठ्ठल जाधव-
सोयगाव तालुक्यातील चाळीस ग्रामपंचायातींसाठी समन्वयक अधिकारी गटविकास अधिकारी सुदर्शन तुपे व क्षेत्रीय अधिकारी विठ्ठल जाधव यांचेकडे जबाबदारी सोपविण्यात आली आहे.चाळीस ग्रामपंचायातींसाठी ४८ निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची निवड करण्यात आली असल्याचे तहसीलदार प्रवीण पांडे यांनी सांगितले.
१) सोयगाव तालुक्यात चाळीस ग्रामपंचायातींसाठी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या निवड करण्यात आल्या आहे.त्यासाठी आचार संहिता अंमलबजावणी बैठक व निवडणूक पूर्व प्रशिक्षण तातडीने आयोजित करण्यात आले आहे.तालुका प्रशासनाची निवडणुका पूर्वतयारी अंतिम टप्प्यात आहे.आचारसंहिता काटेकोरपणे पालन करण्याबाबत ग्रामीण भागात सूचना दिल्या आहे. ―प्रवीण पांडे, तहसीलदार सोयगाव
२)ग्रामपंचायतीच्या आचारसंहितेचा आदेश मिळताच ग्रामसेवकांना तातडीने याबाबत कळविण्यात आले असून सोमवारी याबाबत बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.ग्रामपंचायतींच्या प्रशासकांनाही या बैठकीसाठी बोलाविण्यात आले आहे. ―सुदर्शन तुपे ,गटविकास अधिकारी
३)सोयगाव तालुक्यात आचारसंहितेबाबत पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे.चाळीस ग्रामपंचायतींच्या गावांवर काटेकोरपणे नियंत्रण ठेवण्यात येईल त्यासाठी पुरेपूर बंदोबस्त आहे― सुदाम शिरसाठ,पोलीस निरीक्षक सोयगाव