बीड:आठवडा विशेष टीम―बीड तालुक्यातील मौजे पोखरी येथिल प्रगतिशील शेतकरी दादासाहेब त्रिंबक खिल्लारे यांनी स्वखचाने शेततळे बांधले, सौरऊर्जेवर चालणारा मोटार पंप सुद्धा बसवला त्यात त्यांना एकुण ७ लाख रु.खर्च आला.यावषीं ३ एकर शेतामधे कुंदन जातीचे ईस्त्राईली खरबुज लावले.पिकही भरपुर आले.
कोरोनामुळे हातातोंडाशी आलेला घास गेला
शेततळे & सौर ऊर्जेचा मोटारपंप व भरपुर मेहनतीने पिक जोमात आले आहे.परंतु कोरोना विषाणुचा संसर्ग व प्रादुभाव रोखण्यासाठी बाजारपेठा बंद ठेवण्यात आले आहे.कुंदन जातीचे ढरबुज पिकल्यानंतर २ दिवसांत देठ सोडते.व जास्त काळ राहिल्यास फळ नासते. ३ एकर शेतात ठींबक, औषधफवारणी आणि मजुर यावर एकुण ४ लाख रु.खर्च आला.आणि ऐन फळ तोडुन विकण्याची वेळ आली असता कोरोना विषाणुच्या विरोधात प्रशासनाने जमावबंदी , बाजारपेठा बंद केल्यामुळे आमचे मोठे नुकसान झाले आहे.तरी जिल्हाधिकारी साहेबांनी पंचनामे करून मदत करावी.
जिल्हाधिकारी यांनी कोरोनामुळे बळी जाऊ नये यासाठी जितकी काळजी घेतली जाते तितकीच काळजी फळबागा लागवड करणारांची घ्यावी. तलाठी , कृषि अधिकारी यांच्यामार्फत पंचनामे करून आर्थिक मदत देण्यात यावी.अशी मागणी डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी केली.