क्राईमपूणे जिल्हाब्रेकिंग न्युज

पुणे: आंतरजातीय लग्नाच्या रागातून पुण्यात युवकावर झाडल्या गोळ्या ; गुन्हेगार अटकेत

पुणे : पुणे येथील हिंजवडीमधील चांदणी चौकात 'सैराट'चा थरार घडला आहे.पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर चांदणी चौकाजवळ दुचाकीवरून निघालेल्या तरुणावर तिघांनी पिस्तूलातून गोळीबार केला.पुतणीशी आंतरजातीय विवाह केल्यावरून चुलता, भाऊ आणि त्याच्या मित्रांनी तरुणावर पाच गोळ्या झाडल्या.यामध्ये गोळी लागल्याने तरुण जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. ही घटना काल (बुधवारी) सायंकाळी साडे सातच्या सुमारास चांदणी चौकातील बंद पडलेल्या पेट्रोल पंपासमोर घडली.

तुषार प्रकाश पिसाळ (रा. खेड शिवापुर) याच्यावर गोळीबार झाला असून तो जखमी आहे. या घटनेप्रकरणी आकाश तावरे, सागर तावरे,राजू तावरे,सागर पालवे या चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तुषारचा आणि विद्या यांचा काही दिवसांपूर्वी आंतरजातीय विवाह झाला आहे. या विवाहासाठी विद्याच्या घरच्यांची संमती नव्हती.

दरम्यान, हिंजवडीच्या पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,बुधवारी तुषार आणि त्याचे दोन मित्र तानाजी आणि बबन मोटारसायकलवरून एका नातेवाईकाच्या लग्नासाठी गेले होते. लग्नावरून परतत असताना ते चांदणी चौकातील बंद पडलेल्या पेट्रोल पंपासमोर पोहोचले. चांदणी चौक येथे दुचाकीवरून निघालेल्या तुषारवर गोळीबार करण्यात आला होता. यामध्ये गोळी लागल्याने तो जखमी झाला आहे. गोळी चा आवाज ऐकून चांदणी चौकात बंदोबस्त करत असलेले वाहतूक शाखेचे उपनिरीक्षक घटनास्थळी पोहचले. जखमी तुषार ला रुग्णालयात हलवले. मात्र गोळीबार करणारे फरार झाले होते.

बातमी बद्दल तुमच्या प्रतिक्रिया लिहा

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.