बीड:नानासाहेब डिडुळ― जिल्हा परिषदेचे शिक्षण विस्ताराधिकारी म्हणून आष्टी येथे कार्यरत असणाऱ्या श्रीमती सीमा खंडू टकले काळे यांच्यावर मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी पदनावती करण्याची कारवाई केली होती. श्रीमती. टकले या विस्ताराधिकारी म्हणून आठ वर्षांपासून कार्यरत आहेत त्यांची मूळ नियुक्ती मा. उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार झालेली आहे . त्यांच्या नियुक्ती बाबतचे प्रकरण हे अपर आयुक्त औरंगाबाद यांच्याकडे सुरू होते. अप्पर आयुक्तनी टकले यांचे कोणतेही म्हणणे न ऐकता कोणत्याही कागदपत्राची शहानीशा न करता एकतर्फी निर्णय दिला होता. त्या विरोधात टकले यांनी राज्य सरकारकडे दाद मागितली होती. सदर प्रकरणाची सुनावणी सुरू असतानाच जिल्हा परिषदेने कारवाई केली . त्याविरुद्ध श्रीमती टकले यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयातील सुनावणीच्या दरम्यान युक्तिवाद झाला यामध्ये श्रीमती टकले यांच्या वकिलांनी न्यायालयाच्या लक्षात आणून दिले की श्रीमती टकले यांची विस्ताराधिकारी पदावर आठ वर्षे सेवा झालेली आहे. तसेच त्यांनी विस्तार अधिकारी पदाची विभागीय परीक्षा देखील उत्तीर्ण केली आहे. त्यांना विस्तार अधिकारी पदावर कायम केलेले असून त्यांचे सेवा जेष्ठता यादी मध्ये पाच वर्षापासून नाव समाविष्ट आहे. विस्तार अधिकारी पदाचे विभागीय प्रशिक्षण पूर्ण केलेले आहे. वास्तविक श्रीमती टकले यांची मूळ नियुक्ती ही वेळोवेळी दिलेले आदेश हे उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसारच झालेली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामध्ये नियुक्ती दिलेल्या अधिकाऱ्यांना पुन्हा रिव्हर्स करण्याचा अधिकार नसल्याचा पुरावा सादर करण्यात आला त्यानुसार जिल्हा परिषद यांना कुठलीही कारवाई करता येणार नसल्याचे निदर्शनास आणून दिले. वरील सर्व बाबी पाहता असे निदर्शनास आले की श्रीमती टकले यांनी विस्तार अधिकारी पदाबाबतच्या सर्व पात्रता पूर्ण केलेल्या आहेत सर्व बाजूचे म्हणणे ऐकून घेऊन माननीय न्यायालयाने श्रीमती टकले यांच्या नियुक्तीच्या कारवाईस अंतरिम स्थगिती दिली आहे. श्रीमती टकले यांच्या वतीने अँड महेश भोसले वअन्य विधीतज्ञांनी काम पाहिले. सीमा टकले ह्या सुरेश काळे यांच्या पत्नी आहेत