निलंगा : विविध आरोपाखाली फक्त संशयित म्हणून तुरुंगात असलेल्या अल्पसंख्याक मुस्लीमांची खटले फास्ट्रेक कोर्टात चालवून दोषींना शिक्षा व निरपराधाची सुटका करण्यात यावे, बंद केलेली हज सबसिडीची रक्कम त्वरित अल्पसंख्याक विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी वापरात आणावे, तळीखेड ता. निलंगा येथील पिडीत शिंदे परीवारास तात्काळ मुख्यमंत्री निधीतून पक्के घर बांधून देण्यात यावे, जिल्हा रुग्णालय लातूर येथील डॉक्टरांच्या निष्काळजी व हलगर्जीपणामुळे उपचारासाठी दाखल असलेले रुग्ण शेख मालनबी अहेमद यांचा मृत्यू झाला असून यांच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्या डॉक्टरांवर कठोर कार्यवाही करून गुन्हा दाखल करण्यात यावे, औसा तालुक्यातील अलमला येथील दुर्घटनेतील मुलानी कुटुंबास मुख्यमंत्री निधीतून त्वरित आर्थिक मदत मिळावे अशा मागण्या घेत लातूरच्या निलंगा येथील उपविभागीय कार्यालयासमोर संघटनेचे जिल्हाध्यक्ष मुजीब सौदागर यांच्या नेतृत्वात आंदोलन करून निवेदन देण्यात आले. यावेळी तळीखेड येथील पिडीत शिंदे व पाडोळे दोनीही कुटुंब उपस्थित होते.या आंदोलनास लहुजी शक्ती सेना, वंचित बहुजन आघाडी,डीपीआय या संघटनांनी सक्रिय जाहीर पाठिंबा दिला.
यावेळी तळीखेड येथील पिडीत दोनीही कुटुंब,शहीद टिपू सुलतान संघटनेचे जिल्हाध्यक्ष मुजीब सौदागर,गोविंद सूर्यवंशी लहुजी शक्ती सेना जिल्हाध्यक्ष,पीराजी साठे जिल्हाध्यक्ष डी पी आय,सुनील सूर्यवंशी वंचित बहुजन आघाडी ता अध्यक्ष,सबदर कादरी टिपु सुलतान संघटना ता अध्यक्ष,गायकवाड शरद,तुराब बागवान,हिरा कादरी,जाकिर शेख,नयूम खतीब,सुरज हजारे,उमेश रसाळ,प्रेम शिंदे,अजय कांबळे, तबरेज खडके आदी उपस्थित होते.