दीनदयाळ बँकेच्या युगपुरूष स्वामी विवेकानंद व्याख्यानमालेचा समारोप
अंबाजोगाई:आठवडा विशेष टीम―
“शहरी नक्षलवाद” या विषयावर बोलताना कॅ.स्मिता गायकवाड यांनी विविध दाखले,संदर्भ व पुरावे श्रोत्यांसमोर ठेवून सत्य व वास्तव मांडले.त्या म्हणाल्या की,माओवाद हाच नक्षलवाद आहे.हिंसक विचारसरणी, कार्यपद्धती व बुद्धीभेद करणारे प्रसिद्धी तंञ वापरून भारतीय लोकशाही मोडीत काढण्याचा दुष्ट हेतू माओवाद्यांचा आहे. नवनवे नांवे घेवून दीर्घकालीन युद्धजन्य परस्थिती ते निर्माण करीत आहेत.त्यामुळे मुखवट्या आडचे खरे चेहरे ओळखा. विविधतेने नटलेल्या भारतीय लोकशाहीत अराजक माजवून माओवादी स्वतःला लोकशाहीवादी कसे काय म्हणू शकतात.? असा सवाल करून कॅ.गायकवाड यांनी माओवादी विचारसरणीतील दुटप्पीपणा पुराव्यांनिशी समोर आणला. शहरातले माओवादी हे जंगलातल्या माओवाद्यांपेक्षा अधिक धोकादायक आहेत. भारतात माओवाद्यांना काही तथाकथित बुध्दीवंत लोकांची मदत होतेय.शहरी माओवाद ही केवळ एक कल्पना नसून ते वास्तव आहे.माओवाद्यांना संसदीय लोकशाहीच मान्य नाही तर त्याला त्यांचा विरोधच आहे. शहरी माओवादाचा खरा चेहरा कसा ओळखायचा याबाबत सखोल मार्गदर्शन करून भारतातील माओवादाशी लढा देण्यासाठी कोणत्या संभाव्य उपाययोजना करता येतील याविषयी अभ्यासपूर्ण मार्गदर्शन कॅप्टन स्मिता गायकवाड (मुंबई) यांनी केले.दीनदयाळ बँके तर्फे आयोजित युगपुरूष स्वामी विवेकानंद व्याख्यानमालेतील तृतीय पुष्प गुंफताना त्या बोलत होत्या.
ग्रामीण व शहरी अर्थव्यवस्था बळकट करून “विश्वास,विकास आणि विनम्रता” या त्रिसुत्रीने आर्थिक क्षेत्रात दमदार कार्य करणा-या दीनदयाळ नागरी सहकारी बँकेच्या वतीने दरवर्षी प्रमाणे यावर्षीही 10 जानेवारी ते 12 जानेवारी 2020 या कालावधीत युगपुरूष स्वामी विवेकानंद यांच्या 157 व्या आणि स्वराज्य प्रेरिका राजमाता जिजाऊ माँसाहेब यांच्या जयंती निमित्त व्याख्यानाचे आयोजन केले आहे.रविवार,दि.12 जानेवारी रोजी सायंकाळी 6.30 वाजता कॅप्टन स्मिता गायकवाड (मंबई) यांचे “शहरी नक्षलवाद”
या विषयावर व्याख्यान झाले. यावेळी खोलेश्वर माध्यमिक विद्यालयाच्या “भरतमुनी रंगमंच” या व्यासपीठावर बँकेच्या अध्यक्षा सौ.शरयुताई शरदराव हेबाळकर,बँकेचे उपाध्यक्ष विजयकुमार कोपले,बँकेचे संचालक बिपीनदादा क्षीरसागर, जयवंतराव इटकुरकर,प्राचार्य किसनराव पवार,पुरुषोत्तम भुतडा,राजाभाऊ दहिवाळ,अॅड. अशोकराव कुलकर्णी आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.प्रारंभी प्रास्ताविक करताना बँकेच्या अध्यक्षा सौ. शरयुताई शरदराव हेबाळकर यांनी सांगितले की,आर्थिक क्षेत्रात काम करताना सामाजिक जबाबदारीचे भान ठेवून बँक रौप्य महोत्सवाकडे वाटचाल करीत आहे.बँकेच्या आयटी विभागामार्फत मोबाईल बँकिंग, एसएमएस बँकिंग,एटीएम कार्ड सारख्या विविध सुविधा बँक देते.पुढील काळात ज्येष्ठ नागरिकांना मायक्रो एटीएम,
बँकेच्या सभासद,खातेदार
वाहन धारकांसाठी फास्टॅग नोंदणी व रिचार्ज सुविधा,केवायसी सुविधा आदी विविध सेवा व सुविधा देण्याचा प्रयत्न आहे.काळासोबत वाटचाल करताना ग्राहक हिताकरीता नवनवे बदल, तंञज्ञान स्विकारून दर्जेदार बँकिंग सेवा व सुविधा पुरविण्याचे काम बँक करते. यापुढे ग्राहकांचा वेळ वाचावा, तात्काळ बँकिंग सेवा उपलब्ध व्हावी,याकरीता डिजिटल इंडिया सारखे डिजिटल बँक हे स्वप्न साकार करूयात. आरबीआयच्या नियमांनुसारच बँक काम करते.कर्जदार, ठेवीदार व हितचिंतक यांनी या नव्या सुविधेचा लाभ घ्यावा. बँकेविषयी सहकार्याची भावना ठेवावी.वेळोवेळी आपल्या मौलिक सुचना कराव्यात,संवाद साधावा,बँकेच्या उत्कर्षासाठी सहभाग घ्यावा.कारण,आपल्या प्रतिसादावरच बँकेचे यश हे अवलंबून आहे असे सांगून बँकेच्या अध्यक्षा सौ.शरयुताई शरदराव हेबाळकर यांनी बँकेच्या सर्वांगीण प्रगतीचा अहवाल उपस्थितांसमोर ठेवला. तर यावेळी कॅप्टन स्मिता गायकवाड (मंबई) यांच्या “शहरी नक्षलवाद” या संपुर्ण व्याख्यानात रसिक,श्रोते हे मंञमुग्ध झाले होते.प्रारंभी मान्यवरांनी दीपप्रज्ज्वलन तथा भारतमाता,स्वराज्य प्रेरिका राजमाता जिजाऊ माँसाहेब, पंडीत दीनदयाळजी उपाध्याय आणि स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमांचे पुजन केले.त्यानंतर प्रमुख पाहुण्यांचा परिचय संचालक अॅड.अशोकराव कुलकर्णी यांनी करून दिला. बँकेच्या वतीने सर्व प्रमुख पाहुण्यांचे पुष्पहार,पुष्पगुच्छ व शाल देवून बँकेच्या अध्यक्षा व उपाध्यक्ष यांनी स्वागत केले. जयेंद्र कुलकर्णी यांनी वैयक्तिक पद्य सादर केले.कार्यक्रमाचे सुञसंचालन प्राचार्य किसनराव पवार यांनी केले तर उपस्थितांचे आभार बँकेचे सहाय्यक सरव्यवस्थापक प्रदीपकुमार देशमुख यांनी मानले. व्याख्यानमालेचा समारोप दि.12 जानेवारी,रविवार रोजी झाला.यावेळी बँकेच्या अध्यक्षा सौ.शरयुताई शरदराव हेबाळकर,उपाध्यक्ष विजयकुमार कोपले,संचालक डॉ.दि.ज.दंडे, गौतमचंद सोळंकी,पुरूषोत्तम भुतडा,चैनसुख जाजु,राजाभाऊ दहिवाळ,गोविंद कुडके,अॅड. राजेश्वर देशमुख,बिपीन क्षिरसागर,अॅड.मकरंद पत्की, प्राचार्य किसनराव पवार, जयवंतराव इटकुरकर,तज्ञ संचालक भीमा ताम्हाणे(सनदी लेखापाल),तज्ञ संचालक अॅड. अशोकराव कुलकर्णी व मुख्यकार्यकारी आधिकारी सनतकुमार बनवसकर, अंबाजोगाई शहर व परिसरातील बँकेचे सभासद,ग्राहक, ठेवीदार,हितचिंतक व विविध क्षेञातील मान्यवर,बंधू- भगिणींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी दीनदयाळ बँकेचे सर्व अधिकारी,कर्मचारीवृंद यांनी परीश्रम घेतले.