सोयगाव :मदर केअर सेंटर मध्ये आरोग्य तपासणी

आठवडा विशेष | ज्ञानेश्वर धोंडू पाटील

सोयगाव : लोकसहभागातून सुरू असलेल्या आमखेडा येथील उपकेंद्रात १८ गर्भवती महिलांची आरोग्य तपासणी करून त्यांना मोफत औषध वाटप करण्यात आली.
येथील संजय शहापुरकर यांनी गर्भवती महिला सशक्तिकरण अंतर्गत आमखेडा येथील उपकेंद्रात मदर केअर सेंटर सुरू केले आहे. गुरुवारी झालेल्या आरोग्य शिबिरात पाठवा गर्भवती महिलांची आरोग्य तपासणी आरोग्यसेविका एस एन शिनगारे यांनी केली त्यानंतर या महिलांना संजय शहापूरकर यांच्या हस्ते लोहयुक्त व कॅल्शिअम ची औषधे मोफत वाटण्यात आले.
याप्रसंगी आशा सेविका सविता बडोदे ,दीपा नवगिरे, संगीता चोथमल, बेबी सूर्यवंशी व अंगणवाडी सेविका विद्याताई रोकडे उपस्थित होत्या.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.