पाटोदा:गणेश शेवाळे― बामदळवाडा हा पाटोदा नगरपंचायत हद्दीमध्ये येत असुन येतील लोकांना सर्व नगरपंचायतचे कर भरावे लागतात व लाईट बिलही शहरी भागा प्रमाणे येत असुन लाईटीची सुविधा मात्र ग्रामीण भागा प्रमाणे मिळत असुन एक ते दोन महिने झाले. महावितरणच्या गलथान कारभारामुळे बामदळवाडा येतील लाईट नसल्याने शालेय विद्यार्थ्यांना अभ्यास करता येत नसल्याने विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात चालले आहे. पाण्यासाठी महिलाना वनवन फिरावे लागत आहे. तसेच चोराच्या भीतीने ग्रामस्थ भयभीत झाल्यामुळे घराच्या बाहेर राञीचे फिरणे सुध्दा बंद झाले आहे यामुळे पाटोदा सब स्टेशनची लाईन बामदळवाड्या पासून एक किलोमीटर पर्यत आलेली असून बामदळवाडा येते लाईट आण्यासाठी दहा ते बारा पोलची आवश्यकता लागते यामुळे महावितरण मधील अधिकाऱ्यांनी तात्काळ पाहाणी करून बामदळवाड्याला शहरातील लाईन दहा दिवसाच्या आत जोडून विद्युत पुरवठा सुरळीत करण्यात यावा यासाठी तुम्हाला ग्रामस्थ सहकार्य करतील नसता मुला बाळा सकट ग्रामस्थ महावितरण कार्यालयाला कुलूप ठोकून तहसिलच्या दारात अमरण उपोषण करणार असा इशारा तहसिल कार्यालयाला निवेदना द्वारे बामदळवाडा येतील ग्रामस्थाने दिला आहे.
0