ब्रेकिंग न्युजमहाराष्ट्र राज्य

आमदारांची जनमानसातील प्रतिमा मलीन करणाऱ्यांना मंत्रिमंडळातून डच्चू शहाजीबापू पाटीलांना त्यांचेच वक्तव्य भोवले-हेमंत पाटील

मुंबई:आठवडा विशेष टीम― ‘काय झाडी, काय डोंगर, काय हॉटेल, सर्व कसे ओक्के मध्ये आहे,’ असे वक्तव्य करीत जनमानसात राज्यातील लोकप्रतिनिधितींची अप्रत्यक्षरित्या प्रतिमा मलीन करणाऱ्या सांगोला विधानसभा मतदार संघाचे आमदार शहाजी बापू पाटील यांना मंत्रिमंडळातून डच्चू देण्यात आला आहे. मतदार संघातील जनतेला वाऱ्यावर सोडून राज्यातील सत्तासंघर्षादरम्यान गुवाहाटीत सुट्टीचा आनंद घेत असतांना त्यांची ऑडियो क्लिप व्हायरल झाली होती. त्यांचेच  व्यक्तव्य त्यांना भोवले आहे, असे हेमंत पाटील म्हणाले.

शहाजी बापू यांची ऑडियो क्लिप तुफान व्हायरल झाली.अगदी कमी वेळेत राज्य तसेच देशभरातील लोकांच्या मोबाईल पर्यंत ते पोहचले. लोक त्यांना ओळखू लागले. ते या व्हायरल क्लिपमुळे प्रसिद्ध तर झाले मात्र त्यांची किंमत संपली.अशाच किंमत संपलेल्या व्यक्तीला मंत्रिमंडळात स्थान न देण्याचा निर्णयाचे स्वागत करतो,अशी भावना हेमंत पाटील यांनी व्यक्त केली.

सत्ताकारणात आमदार केवळ घोडेबाजार करीत सरकार उलथून टाकण्यासाठी कुठल्याही स्तरावर जावू शकतात. मोठ्या हॉटेलमध्ये राहतात, खुप पैसा खर्च करतात, निर्सगरम्य ठिकाणी फिरतात असे चित्र शहाजी बापू यांच्या व्हायरल क्लिपवरून सर्वसामान्यांच्या डोळ्यासमोर उभे राहते. सत्तासंघर्षादरम्यान आमदारांना निवडून देणाऱ्या मतदारांना त्यांचा विसर पडतो. मौजमज्जा करण्यासाठी लोकप्रतिनिधी कुठे ही, कुठल्याही स्तराला जावू शकतात, असा संभ्रम आणखी बळकट होण्यासाठी शहाजी बापूंच्या क्लिपमुळे भर पडली. त्यामुळे अशा आमदारांचा सर्वात अगोदर राजीनामा घेतला पाहिजे. किमान असे नेतृत्व नसल्याने जनमानसातील लोकप्रतिनिधींची प्रतिमा सुधारण्यात मदत होईल,असे हेमंत पाटील म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Back to top button