औरंगाबाद: जुनाबाजार मुख्य टपाल कार्यालयात व सर्व कार्यालयात भारताचा राष्ट्रध्वज उपलब्ध असून राष्ट्रध्वजाची किंमत २५ रू असून नागरीकांनी याचा लाभ घ्यावा असे आव्हान पोस्टमास्तर सुरेश बनसोडे यांनी केले आहे.
भारतीय राष्ट्रध्वज हे संपूर्ण राष्ट्रसाठी राष्ट्रीय अभिमानाचे प्रतीक आहे. आपल्या ध्वजाचा अधिक सन्मान करण्यासाठी ‘आझादी का अमृत महोत्सव’ उपक्रमांतर्गत मा. प्रधानमंत्री व संचारमंत्री भारत सरकार यांच्या संकल्पनेतून ‘हर घर तिरंगा’ मोहिम राबविली जात आहे. या अंतर्गत सर्व भारतीयांना त्यांच्या घरी राष्ट्रध्वज फडकविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ध्वजाशी आपले नाते नेहमीच अनौपचारिक आणि संस्थात्मक राहिले आहे. स्वातंत्र्याचा 75 व्या वर्षी राष्ट्र म्हणून एकत्रितपणे ध्वज घरी आणणे हे केवळ तिरंग्याची वैयक्तिक संबंधाचे नव्हे तर राष्ट्र उभारणीसाठी आपल्या वचन बद्धतेचेही प्रतीक आहे. ही भावना जागृत करणे ही या उपक्रमामागील कल्पना आहे. लोकांच्या मनात देशभक्ती जागृत करणे आणि आपल्या राष्ट्रध्वजाबद्दल जागरुकता वाढविणे हा उद्देश आहे. 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान ही मोहीम राबविली जाणार आहे. देशातील 20 कोटी घरामध्ये तिरंगा पोहचविणे हे उद्दिष्ट डोळयासमोर ठेऊन केंद्र सरकारने भारतातील पोस्ट ऑफिस मध्ये भारतीय राष्ट्रध्वज नागरिकांसाठी विकत घेण्यासाठी उपलब्ध करुन देण्यात आला आहे. यावेळी पोस्टमास्तर बनसोडे यांनी सांगितले की, आजपर्यंत १० हजारावर राष्ट्रध्वाजीची विक्री झाली असून १४ ऑगस्ट पर्यंत पोस्टाचा काउंटरवर विक्री चालू राहिल असे सांगण्यात आले आहे.यावेळी पोस्टाचे अधिकारी व कर्मचारी सुनिल कोळी, लखन वैष्णव,अनिल शेळके, शेख शकील, केदार देशपांडे राष्ट्रध्वज घेणारे सचिन पाटील आदी नागरिकांनी या उपक्रमामध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन हर घर तिरंगा उपक्रम यशस्वी करावा असे आवाहन प्रवर डाकपाल सुरेश बनसोडे मुख्य डाकघर ,औरंगाबाद यांनी केले आहे.