पाटोदा तालुकाबीड जिल्हाब्रेकिंग न्युज

गंवडी व बांधकाम मजुरांना महाराष्ट्र राज्य इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळाचे मिळणारे अनुदान तात्काळ वाटप करा

पाटोदा(शेख महेशर): सध्या दुष्काळजन्य परिस्थीती असुन पाणी उपलब्ध नसल्यामुळे बांधकामे पुर्ण पणे बंद आहेत त्या मुळे सदरील गंवडी व बांधकाम मजुर यांच्या वर व त्यांच्या कुटुंबीयावर उपासमारीची वेळ आलेली आहे,बीड बांधकाम मजुर ऑफिसला आज पर्यंत ज्या गवंडी / बांधकाम मजुर यांनी नाव नोंदणी केलेली आहे व अनुदान मिळण्यासाठी अर्ज केलेला आहे. त्यांना त्यांचे अनुदान त्वरीत देण्यात यावेत.
ज्या मजुरांना आता दुष्काळा मध्ये काम नाही त्यांची नवीन नाव नोंद करुन त्यांचा अर्ज बांधकाम मजुर संस्था कार्यालय यांनी घ्यावा. मजुरा वर दुष्काळा मध्ये जी उपासमारीची वेळ आलेली आहे या सर्व बाबीचा शासनस्तरावर पाठपुरावा करुन बांधकाम मजुर यांना योग्य ते न्याय देण्यात यावा. आणि दुष्काळा मध्ये सापडलेला बांधकाम मजुर यांना बांधकाम विभागा कडून सर्व स्तरावर जी दुष्काळा मध्ये योजना आहे त्या देण्यात यावेत. असे आशयाचे निवेदन पाटोदा तहसीलदार यांना देण्यात आले आहे. या निवेदनावर अॅड. जब्बार पठाण, शेख इम्रान, उमर चाऊस, सलीम मिस्त्री, अजीम मिस्त्री, सय्यद लतीफ, सय्यद साजिद, अनिस मिस्त्री, इसाक मिस्त्री, जलील मिस्त्री, आरिफ मिस्त्री, फय्याज मिस्त्री, बळीराम मिस्त्री,शेख मसरुदिन मिस्त्री, संतोष मिस्त्री, जाहेद मिस्त्री, बोराडे मिस्त्री, जहीर मिस्त्री, नदीम मिस्त्री, फेरोज मिस्त्री, यांच्या सह इत्यादी बांधकाम व्यावसायिक, मजूर, कामगार यांच्या सह्य़ा आहेत.

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.