बीड :आठवडा विशेष टीम― लोकसभा निवडणुकानंतर आता महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेच्या निवडणूका जवळ आल्या आहेत.त्यात लोकसभेमुळे राजकारणाचे तापमान अगदी उच्चांकापर्यंत गेले आहे.बीड जिल्ह्यातील आष्टी-पाटोदा-शिरूर विधानसभा मतदारसंघ हा जिल्ह्यात चर्चेचा विषय बनला आहे.भाजपासह राष्ट्रवादी व इतर पक्षाचे कार्यकर्ते जोमाने कामाला लागल्याचे दिसत आहे.तेवढ्यात पाटोदा तालुक्यातील जनतेच्या मनात एक मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.खरच ह्यावेळेस आमदारकीला पाटोदा तालुक्याला न्याय मिळेल का ? भाजपा,राष्ट्रवादीवाले पाटोदयाचाच उमेदवार देतील का ? का पुन्हा आष्टीच्याच गळ्यात आमदारकीची माळ घालतील ? असे प्रश्न उपस्थित होत आहेत.पाटोदाचे माजी आमदार स्वर्गीय लक्ष्मणराव (तात्या) जाधव यांच्या नंतर पाटोदाचा आमदार होण्याचा मान कुणाला मिळेल याची चाहूल लागली आहे.पाटोदा तालुक्यात सुरेश (आप्पासाहेब) राख ,रामकृष्ण बांगर,महेंद्र गर्जे,राजाभाऊ देशमुख,महादेव नागरगोजे,विष्णुपंत घोलप यांच्यासारखे दिग्गज नेते पाटोदा तालुक्यात आहेत.पाटोदा तालुक्यातील जनतेचे विधानसभा उमेदवारीकडे लक्ष लागून आहे.उमेदवारीची माळ पाटोदाच्याच दिग्गजांच्या गळ्यात पडावी अशी तालुक्यातील जनतेची इच्छा आहे.
किती जिल्हा परिषद,पंचायत समिती सदस्य व ग्रामपंचायत सरपंच, सदस्य कोणाच्या पाठीमागे आहेत ह्यावरून उमेदवारी ठरणार आहे.कार्यकर्त्यांची फळी व विरोधकांची अंतर्गत मदत पाटोदा तालुक्यातील उमेदवाराच्या विजयासाठी मोठा आधार ठरणार आहे.पाटोदा तालुक्यातील राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठी अंतर्गत गटबाजी पाहायला मिळते,हा एक मोठा निवडणूकितील निगेटीव्ह पॉईंट राहील.
विशेष म्हणजे,पाटोदा तालुक्यातील बऱ्याच गाव-वाड्यांना अद्यापही रस्ते नाहीत अशा कामांकडे कोणता नेता लक्ष देतो ह्यावरून देखील राजकीय समीकरणे बदलणार आहेत.पाटोदा तालुक्यातील दिग्गजांनी या कामासाठी प्रयत्न केल्यास जनता देखील त्यांच्या पाठीशी उभी राहील आणि तालुक्याला उमेदवारी मिळण्यासाठी प्रयत्न करेल.