सोयगाव:ज्ञानेश्वर धोंडू पाटील―
सोयगाव नगर पंचायतीसाठी रविवारी एका प्रभागासाठी १६ टक्के मतदान शांततेत पार पडले,दरम्यान एका जागेसाठी रिंगणात असलेल्या दोन्ही उमेदवारांचे भवितव्य बंद झाले आहे.शिवसेनेच्या भारती इंगळे आणि अपक्ष सिकंदर तडवी हे दोन उमेदवार रिंगणात होते.
नगर पंचायतीच्या पोट निवडणुकीसाठी मतदान घेण्यात आले,३५८ मतदारांपैकी २७२ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असून चुरशीच्या झालेली लढतीत दोन्ही उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले आहे.दरम्यान सोमवारी मतमोजणी करण्यात येणार असून उत्सुकता शिगेला पोहचली आहे.निवडणूक निर्णायक अधिकारी प्रवीण पांडे,निवडणूक विभागाचे नायब तहसीलदार विठ्ठल जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली मतदान प्रक्रिया पार पडली,यावेळी सोयगाव पोलिसांचा चोख बंदोबस्त होता.
0