अंबाजोगाई:आठवडा विशेष टीम― गेवराई आणि अंबाजोगाई येथील कोरोनाचा निगेटिव्ह रिपोर्ट आलेल्या दोघांचा मृत्यू झाल्याची घटना आज घडली. या दोघांच्या मृत्यूचे कारण समोर आले नसून तपासणी आवाहालानंतरच कारण स्पष्ट होईल असे वैद्यकिय सुत्रांनी सांगितले. अंबाजोगाई येथील स्वाराती रूग्णालयात दोन दिवसापूर्वी दाखल करण्यात आलेल्या एका ४० वर्षीय कोरोना संशयिताचा आज मंगळवारी सकाळी मृत्यू झाला. हा संशयित मुळचा ओरीसा राज्यातील आहे. एक बोअरवेलच्या गाडीवर तो मजुरी करत असे. दोन दिवसापूर्वी कोरोना सदृश्य लक्षणांमुळे त्याला स्वारातीच्या आयसोलेशन वॉर्डात दाखल करण्यात आले होते. आज सकाळी ९.३० वाजताच्या सुमारास या रूग्णाचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान सदरील रूग्णाचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आल्याची माहिती वैद्यकिय अधिकाऱ्यांनी दिली. आहे.दरम्यान गेवराई तालुक्यातील एका रुग्णाचा कोरोना रिपोर्ट सोमवारी निगेटिव्ह आला होता. मात्र सोमवारी रात्री उशिरा त्या रुग्णाला त्रास होऊ होवून त्याचा मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली आहे. त्याचा मृत्यू का झाला ? याचे कारण स्पष्ट झाले नसून तो औरंगाबाद येथून आला होता अशी माहिती समोर येत आहे. दरम्यान दोन्ही मृत व्यक्तींचे स्वब पुन्हा पुणे येथील प्रयोगशाळेत पाठवण्यात येणार असून त्यानंतरच त्यांच्या मृत्यूचे कारण समोर येणार असल्याचे सुत्रांनी सांगितले आहे.