औरंगाबाद जिल्हाब्रेकिंग न्युजशेतीविषयकसोयगाव तालुका

कपाशी पीकविमा सुधारित आकारावा ; सामुहिक आत्महत्येचे बारा खेड्यातील शेतकऱ्यांचे निवेदन

आठवडा विशेष | ज्ञानेश्वर धोंडू पाटील

सोयगाव : बनोटी मंडळातील शेतकऱ्यांना ऐन दुष्काळाच्या वर्षात खरिपाच्या हंगामातील पिकविम्यापोटी हेक्टरी तुटपुंजी मदत मिळत असल्याने चक्क ३८०० रु.प्रती हेक्टरी रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग होत असल्याने बनोटी मंडळातील बारा गावातील ५० शेतकऱ्यांनी सामुहिक आत्महत्येचे निवेदन शुक्रवारी सोयगाव तहसील कार्यालयाला दिले आहे.यामुळे सोयगावात खळबळ उडाली आहे.
दुष्काळी पट्टा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बनोटी मंडळातील दुष्काळाच्या कचाट्यात अडकलेल्या शेतकऱ्यांना महसूल,कृषी आणि संबंधित कंपन्यांच्या हलगर्जीपणामुळे केवळ ३८०० रु.हेक्टरी खरिपाच्या कपाशी पिकांच्या नुकसानीपोटी तुटपुंजी रक्कम खात्यावर वर्ग होत आहे.सोयगाव तालुक्यातील उर्वरित मंडळात मात्र हा प्रकार नसून या मंडळात १५८०० याप्रमाणे कपाशी पिकांची विमा रक्कम क्झात्यावर वर्ग होत असल्याने एकाच तालुक्यातील महसुली मंडळात तफावत कशी असाही प्रश्न उपस्थित होत असल्याने ५० शेतकऱ्यांनी सामुहिक आत्महत्येचे निवेदन दिले आहे.त्याचप्रमाणे मका पिकांच्या पिकविम्यातही मोठी तफावत असल्याने बनोटी मंडळातील शेतकऱ्यांवर अन्यायकारक भूमिका शासनाने घेतली असल्याचा आरोप या संतप्त शेतकऱ्यांनी केला आहे.खरिपाच्या कपाशी पिकांच्या पिकविम्यात आकारणा करण्यात सुधारणा न केल्यास संतप्त शेतकरी तहसील व कृषी कार्यालयासमोर सामुहिक आत्महत्या करणार असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.पहुरी,तितूर,गलवाडा,गोंदेगाव,घोरकुंड,वाकडी,वनगाव,मुखेड,पळाशी,हनुमंतखेडा,उप्पलखेडा,धाप अंतुर या गावातील पन्नास शेतकऱ्यांनी सामुहिक अम्तःत्येचे निवेदन दिले आहे.निवेदनावर आनंद पाटील,अरविंद निकम,तात्यासाहेब बोरसे,पोपट धुमाळ,सुनील माने,दिलीप पाटील,दिलीप काचोळे,पुंडलिक दुबे,दिलीप शिवाजी पाटील आदींच्या स्वाक्षरया आहे.

बोंडअळी,सन्मान योजना अनुदान प्रलंबित-

दरम्यान या मंडळातील अनेक गावातील शेतकऱ्यांन अद्याप बोंडअळी नुकसानीचे रक्कम मिळाली नाही,त्याच बरोबर सन्मान योजनेचा निधीही वर्ग झालेला नसल्याने ऐन दुष्काळात बनोटी मंडळातील शेतकऱ्यांची तालुका प्रशासनाकडून फसवणूक करण्यात आल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

सामुहिक आत्महत्येचे निवेदन जिल्हाधिकार्यांना सादर-

दरम्यान बारा खेड्यातील पन्नास शेतकऱ्यांनी पिकविम्याच्या प्रश्नावर सामुहिक आत्महत्येचे निवेदन महसूल व कृषी विभागाकडे सादर केल्याने तातडीने निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आल आहे.

बातमी बद्दल तुमच्या प्रतिक्रिया लिहा

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.