अंबाजोगाई:आठवडा विशेष टीम―अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या महाराष्ट्र राज्य समन्वयकपदी तालुक्यातील माकेगाव येथील तरूण कार्यकर्ते संजय बालासाहेब वाघमारे यांची निवड करण्यात आली आहे. काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस के.सी. वेणुगोपाल यांनी सदर निवड झाल्याचे वाघमारे यांना कळविले आहे. काँग्रेस पक्षाला संघटनात्मकदृष्ट्या बळकटी देणे,पक्षाचा विचार ग्रामीण व शहरी भागात शेवटच्या माणसापर्यंत पोहोंचविण्याचे कार्य तसेच युवक, युवती, महिला यांना काँग्रेस पक्षाशी जोडणे आदी कार्य राज्य समन्वयक म्हणुन करावी लागणार आहे.बीड जिल्ह्याला वाघमारे यांच्या माध्यमातून काँग्रेस पक्षाने संघटनेतील महत्वाची जबाबदारी सोपविल्याबद्दल संजय वाघमारे यांच्या निवडीचे सर्वस्तरांतून अभिनंदन होत आहे.
अंबाजोगाई तालुक्यातील माकेगांव येथील रहिवाशी असलेले संजय बालासाहेब वाघमारे यांनी 2006 साली एन.एस.यु.आयच्या माध्यमातून काँग्रेस पक्षात कार्य करण्यास सुरूवात केली.2007 साली त्यांना युवक काँग्रेसचे तालुका उपाध्यक्षपद मिळाल्यानंतर त्यांनी अंबाजोगाई तालुक्यात यापुर्वी झालेल्या ग्रामपंचायत,पंचायत समिती,जिल्हा परिषद, विधानसभा आणि लोकसभा निवडणूकीत पक्षाचा जनाधर वाढविण्यासाठी प्रामाणिकपणे केलेल्या कार्याची दखल अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे राष्ट्रीय सरचिटणीस के.सी. वेणुगोपाल यांनी घेतली व संजय बालासाहेब वाघमारे यांची अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस कमिटीच्या राज्य समन्वयकपदी निवड केली.निवड केल्याबद्दल संजय वाघमारे यांनी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे राष्ट्रीय सरचिटणीस के.सी. वेणुगोपाल,महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आ.बाळासाहेब थोरात,खासदार मुकुल वासनिक,महाराष्ट्र अनु.जाती विभागाचे
प्रदेशाध्यक्ष विजय अंभोरे,आमदार वर्षाताई गायकवाड,माजी मंञी दिलीपराव देशमुख यांचे आभार मानले आहेत.तर संजय वाघमारे यांचे निवडीबद्दल बीड जिल्हा काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष राजकिशोर मोदी,प्रा.सर्जेराव काळे,जिल्हा कार्याध्यक्ष अशोक हिंगे, अॅड.अनंतराव जगतकर,वसंतराव मोरे,भगवानराव ढगे,ईश्वर शिंदे आदींनी अभिनंदन केले आहे.