मुंबईसामाजिक

मराठी पत्रकार परिषदेच्या राज्यस्तरीय आदर्श तालुका पत्रकार संघ पुरस्कारांची घोषणा

लवकरच पुरस्कार वितरण―एस. एम.देशमुख

मुंबई (विशेष प्रतिनिधी):देशातील मराठी पत्रकारांची मातृसंस्था असलेल्या मराठी पत्रकार परिषदेच्यावतीने दरवर्षी देण्यात येणाऱ्या स्व.वसंतराव काणे आदर्श तालुका पत्रकार संघ पुरस्काराची आज घोषणा करण्यात आली असून प्रत्येक महसूल विभागातून एक या प़माणे राज्यातून नऊ तालुका पत्रकार संघ या पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत. लवकरच मान्यवरांच्या हस्ते या पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार असल्याची माहिती परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम देशमुख सर यांनी एका प्रसिध्दी पत्रकाव्दारे दिली आहे.
पुरस्कारा साठी निवड झालेले परिषदेशी संलग्न तालुका पत्रकार संघ आणि त्यांचे विभाग पुढील प्रमाणे, पुणे विभाग – करमाळा तालुका मराठी पत्रकार संघ. जिल्हा सोलापूर,कोकण विभाग – वाडा तालुका मराठी पत्रकार संघ. जिल्हा पालघर, नाशिक विभाग – तळोदा तालुका मराठी पत्रकार संघ. जिल्हा नंदूरबार, कोल्हापूर विभाग – कागल तालुका मराठी पत्रकार संघ. जिल्हा कोल्हापूर, लातूर विभाग – कळमनुरी तालुका मराठी पत्रकार संघ. जिल्हा हिंगोली, औरंगाबाद विभाग आष्टी तालुका युवा पत्रकार संघ. जिल्हा बीड, अमरावती विभाग – मालेगाव तालुका मराठी पत्रकार संघ. जिल्हा वाशिम, नागपूर विभाग – चामोरशी तालुका मराठी पत्रकार संघ. जिल्हा गडचिरोली, तसेच रंगाअण्णा वैद्य आदर्श जिल्हा मराठी पत्रकार संघ पुरस्कार नांदेड जिल्हा पत्रकार संघाला देण्यात आला असून या पुरस्काराची घोषणा या पुर्वीच करण्यात आलेली आहे.
स्मृतीचिन्ह, मानपत्र, शाल, श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप असून पुरस्कार वितरण सोहळा लवकरच घेण्यात येणार असल्याचे परिषदेने कळविले आहे.
परिषदेचे मुख्य विश्‍वस्त एस.एम.देशमुख, विश्‍वस्त किरण नाईक, अध्यक्ष सिध्दार्थ शर्मा, कार्याध्यक्ष गजानन नाईक, सरचिटणीस अनिल महाजन, कोषाध्यक्ष शरद पाबळे तसेच सर्व विभागीय सचिवांनी सर्व पुरस्कार प्राप्त तालुका आणि जिल्हा पत्रकार संघाचे अभिनंदन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Back to top button