शेख महेशर― जेष्ठ निरोपनकार महाराष्ट्र भूषण डॉ.श्री.नानासाहेब धर्माधिकारी यांच्या स्मृती दिनानिमित्त लायन हार्ट ग्रुप नवी मुंबई यांच्या वतीने संस्थापक अध्यक्ष विरेंद्र ( गुरु )म्हात्रे यांच्या तर्फे नेरुळगाव येथील सफाई कामगारांना कोरोना विषाणू पासून बचाव करण्यासाठी सेनेटायझर व मास्कचे वाटप बुधवारी करण्यात आले.
या वाटपाच्या कार्यक्रमासाठी विशेष मान्यवर म्हणून सिनेअभिनेत्री नयना पवार तसेच वंचित बहुजन आघाडी जिल्हाध्यक्ष विरेंद्र लांगाडे, जयश्री फाउंडेशन अध्यक्ष वैभव जाधव व क्षितिज पर्वचे संपादक सनिप कलोते, नवी मुंबई जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष महेश भनगे, नवी मुंबई राष्ट्रवादी मच्छीमार चे अध्यक्ष राहुल म्हात्रे इत्यादी मान्यवर सह लायन हार्ट ग्रुप नवी मुंबई उपाध्यक्ष अक्षय पाचारने, खजिनदार रोशन पाटील, उपखजिनदार शुभम सांळूखे, सचिव सचिन जाधव,उमेश टोके व ईतर सदस्य उपस्थित होते.
0