भतानवाडीला पाणीदार करण्यासाठी ग्रामस्थ एकवटले..!
अंबाजोगाई:दुष्काळाच्या आपत्तीला इष्टापत्ती मानून भतानवाडी येथील ग्रामस्थ एकवटले आणि पाणी फाऊंडेशनच्या सत्यमेव जयते वॉटरकप स्पर्धेत सहभाग घेतला. स्पर्धा सुरू झाल्यापासुन भतानवाडी ग्रामस्थांनी तब्बल 1 किलोमीटर लांब नदीचे पात्र खोलीकरण व रूंदीकरणाचे काम पुर्ण केले आहे.अनेक दानशुर व्यक्ती,संस्था आणि शासनाने ही या कामी भतानवाडी ग्रामस्थांना पाठबळ देत भतानवाडी पाणीदार करण्यासाठी कटीबद्धता दाखविली आहे.भतानवाडीत आता श्रमदानाचे तुफान आलया.त्यामुळे यंदाच्या पावसाळ्यात भतानवाडी पाणीदार गाव होणार आहे.यात शंका नाही.
दुष्काळात पाणी फाऊंडेशनच्या सत्यमेव जयते वॉटरकप स्पर्धेत भतानवाडीने सहभाग घेतला.ही स्पर्धा यंदा ही दुष्काळग्रस्तांसाठी धावून आली असेच म्हणावे लागेल कारण, अंबाजोगाई तालुक्यातील भतानवाडी या गावाला दोन तलाव असतानाही सातत्याने दुर्भिक्ष्याचा सामना करावा लागत आहे.पाणी फाऊंडेशनच्या सत्यमेव जयते वॉटरकप स्पर्धेने सुरु केलेल्या गाव पाणीदार करण्याच्या अभियानात भतानवाडीकरांनी यंदाही सहभाग नोंदवला.मानवलोक, भारतीय जैन संघटना, शासनाचा लघु पाटबंधारे विभाग, अंबाजोगाई पंचायत समिती,वन विभाग, भतानवाडी येथील जिल्हा परिषद शाळा, अंगणवाडी, ग्रामपंचायत,आरोग्य विभागाच्या आशा स्वयंसेविका व भतानवाडी येथील सर्व ग्रामस्थ यांनी एकत्र येत
मानवलोकने पुरवलेल्या पोकलेन यंत्रांना इंधनासाठी 1 लाख रुपयांचा निधी लोकसभागातून गावकर्यांनी जमा केला.तर भारतीय जैन संघटनेने जेसीबी यंत्र पुरविले,लघुपाटबंधारे विभागाने तीन हजार ट्रॅक्टर गाळ काढण्यासाठी सहकार्य केले.शासनाने इंधन पुरविले.आणि श्रमदानातून भतानवाडी येथे 8 एप्रिल पासुन ते आज 14 मे पर्यंत खोल समपातळी चर हे 150 एकर मध्ये करण्यात आले आहेत.तसेच 150 एकर मध्ये वृक्ष लागवडीसाठी खड्डे खोदण्यात आले आहेत. जुलै महिन्यात वन विभाग अंबाजोगाई यांच्या माध्यमातून सुमारे दिड लाख वृक्ष लागवड करण्यात येणार आहेत.यासाठी वनरक्षक बालाजी नागरगोजे व शिंदे साहेब यांचे मार्गदर्शन व मदत होत आहे.24 जलशोषक चर तयार करण्यात आले आहेत. पुढील काळात भतानवाडी येथील जिल्हा परिषदेचा सिंचन तलाव व लघुपाटबंधारे विभागाचा पाझर तलाव या मधील साठलेला गाळ काढण्यात येणार आहे.तसेच नदी खोलीकरण रूंदीकरणचे वाढीव काम करण्यात येईल, वृक्ष लागवडीसाठी पंचायत समिती अंबाजोगाई यांचे सहकार्य घेवून खड्डे खोदले जाणार आहेत. लुज बोल्डर स्ट्रक्चरची कामे केली जाणार आहेत.या सर्व कामांसाठी भतानवाडी येथील सरपंच सौ.रूक्मीणीताई विठ्ठल भताने,उपसरपंच साविञीताई भताने,सर्व ग्रा.पं.सदस्य,ज्येष्ठ नेते विठ्ठलराव भताने,सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन नागनाथ भताने,पोलिस पाटील,दादासाहेब भताने,जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक बिराजदार,जलदुत ज्ञानदेव भताने,विद्याताई नागनाथ भताने, कविताताई मधुकर भताने,पर्यवेक्षिका एस.बी.गायकवाड, आशा स्वयंसेविका गोदावरीताई भताने आदींसहीत प्रतिष्ठीत नागरिक व समस्त भतानवाडी ग्रामस्थांनी पुढाकार घेतला आहे.
भतानवाडी येथे 16 मे रोजी महाश्रमदान
तालुक्यातील भतानवाडी येथे सुरू असलेल्या पाणी फाऊंडेशनच्या ‘सत्यमेव जयते वॉटरकप स्पर्धेत’
भतानवाडीकरांना प्रोत्साहन देण्यासाठी गुरूवार,दि.16 मे रोजी महाश्रमदान होत आहे. यात अंबाजोगाई
पंचायत समिती, भारतीय जैन संघटना, रोटरी क्लब,मानवलोक, रेणुका सेवाभावी संस्था, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, जनकल्याण समिती आदींसहीत विविध व्यक्ती,संस्था सहभागी होत आहेत. महाश्रमदानाच्या माध्यमातून भतानवाडी गावाला पाणीदार करण्याचा संकल्प पुर्णत्वास जाणार आहे.