बिंदुसरा प्रकल्प पाहणी,नांदुर हवेली येथे शेतकर्यांशी संवाद ; कामखेडा चारा छावणीस भेट-बीड जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजकिशोर मोदी यांची माहीती
अंबाजोगाई (प्रतिनिधी): महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रांत अध्यक्ष खा.अशोकराव चव्हाण यांच्या सुचनेवरून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे मुख्य प्रतोद तथा सरचिटणीस आ.बसवराज पाटील व काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते हे मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त भागाच्या दौर्यावर असून या माध्यमातून दुष्काळी जनतेला दिलासा देण्यासाठी गुरूवार,दि.16 मे रोजी बीड जिल्ह्यात येत असून ते सायंकाळी 4 वाजता नांदुर हवेली व बिंदुसरा धरण (ता.जि.बीड) प्रकल्पाची पाहणी करून कामखेडा येथील चारा छावणीस भेट देवून आपल्या पाहणी दौर्यात ते बीड तालुक्यातील दुष्काळग्रस्त भागातील शेतकर्यांशी थेट संवाद साधणार आहेत.अशी माहीती बीड जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजकिशोर मोदी यांनी दिली आहे.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रांत अध्यक्ष खा.अशोकराव चव्हाण यांच्या सुचनेवरून मराठवाडा विभागातील औरंगाबाद,जालना,बीड व उस्मानाबाद या जिल्ह्यांसाठी एक समिती गठीत करण्यात आली आहे या समितीचे अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे मुख्य प्रतोद तथा सरचिटणीस आ.बसवराज पाटील व काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते
हे बीड जिल्ह्यात दुष्काळ पाहणी दौरा करीत असून त्यांचे गुरूवार,दि.16 मे रोजी सायंकाळी चार वाजता नांदुर हवेली (ता.जि.बीड) येथे आगमन होईल.यावेळी
त्यांचे सोबत समिती सदस्य माजी आ.सुरेश जेथलिया,आ.कैलास गोरंट्याल,आ.सुभाष झांबड,विलास औताडे, माजी आ.अशोक पाटील,समिती समन्वयक भिमराव डोंगरे हे ज्येष्ठ नेते असतील.हे सर्व नेते दुष्काळग्रस्त शेतकर्यांशी चर्चा करतील,दुष्काळा बाबतची माहिती घेतील.सायंकाळी 5 वाजता कामखेडा (ता.जि.बीड) येथे सुरू असलेल्या चारा छावणीस आ.बसवराज पाटील व इतर सर्व नेते हे भेट देतील.सायंकाळी 6.30 वाजता बिंदुसरा धरण प्रकल्पाचे पाहणी करून परिसरातील शेतकर्यांशी चर्चा करतील.ते यावेळी बीड जिल्ह्यातील दुष्काळाचा आढावा घेणार आहेत. दुष्काळग्रस्त शेतकर्यांच्या व्यथा, वेदना जाणून घेवून दुष्काळी परस्थितीत नेमक्या कोणत्या उपाययोजना कराव्या लागतील,नागरिकांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था,जनावरांसाठी चारा व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, रोजगार,चारा छावणीच्या अडचणी याबाबतची माहीती घेणार आहेत.तसेच बीड जिल्ह्याच्या जिल्हाधिका-यांशीही ते पहाणी दौ-यात चर्चा करणार आहेत.या
दौ-यात बीड जिल्हा प्रभारी प्रा.सत्संग मुंडे, माजी मंञी प्रा.सुरेश नवले,प्रदेशसरचिटणीस प्रा.टि.पी.मुंडे,माजी आ.सिराजभाई देशमुख, काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष प्रा.सर्जेराव काळे आदींसहीत प्रदेश, जिल्हा,तालुका कार्यकारीणीचे पदाधिकारी हे उपस्थित राहणार आहेत.
यापुर्वीही काँग्रेसच्या वतीने माजी मुख्यमंञी पृथ्विराज चव्हाण,माजी मंञी राधाकृष्ण विखे पाटील,हर्षवर्धन पाटील आदींनी बीड जिल्ह्याच्या दुष्काळी भागास भेटी देवून शेतकर्यांना दिलासा व धिर देण्याचे काम केले आहे.तसेच दुष्काळग्रस्त व आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटूंबांना अन्नधान्य वाटप करून बीड जिल्हा काँग्रेस कमेटीने आधार देवून सहकार्य व मदत करण्याची भूमिका वेळोवेळी घेतलेली आहे.अशी माहीती बीड जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजकिशोर मोदी यांनी दिली आहे.
तरी काँग्रेस पक्षाच्या बीड जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी,स्थानिक स्वराज्य संस्थांचे प्रतिनिधी,सहकारी संस्थांचे पदाधिकारी, माजी मंत्री,खासदार, माजी खासदार, आमदार,माजी आमदार,महीला आघाडी,युवक काँग्रेस, एनएसयुआय,सेवादल,ग्रंथालय सेल,एस.सी. सेल,ओबीसी सेल, एस.टी.सेल, अल्पसंख्यांक सेल, किसान सेल,आरोग्य सेल यांचे सर्व पदाधिकारी तसेच सर्व तालुका पक्ष निरीक्षक, ब्लॉक अध्यक्ष,सर्व तालुकाध्यक्ष,सर्व शहराध्यक्ष तसेच जिल्हा परिषद,पंचायत समिती, नगरपरिषद,नगर पंचायत,सहकारी संस्था यांचे सदस्य,प्रमुख व पक्षाचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी,शेतकरी बांधवांनी नांदुर हवेली, कामखेडा चारा छावणी, बिंदुसरा प्रकल्प येथे मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन भारतीय राष्ट्रिय काँग्रेस पक्षाचे बीड जिल्हाध्यक्ष राजकिशोर मोदी,बीड तालुका काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष महादेव धांडे यांनी केले आहे.