पाटोदा-शिरूर तालुका तालुक्याचा विकास खुंटला खेडी पडली ओस
पाटोदा (शेख महेशर): पाटोदा शिरूर चा फक्त वापरा आणि फेका अशीच राजकीय भूमिका
भारत स्वतंत्र झाल्यापासून पाटोदा तालुक्याला अडीच वर्षे आमदार की मिळाली तर शिरूर तालुक्याचा अद्याप पर्यंत आमदार झालाच नाही. या साठी येणाऱ्या २०१९ च्या विधानसभेत दोन्ही तालुक्याने एकत्र येऊन एक उमेदवार द्यावा व पाटोदा /शिरूरचा आमदार करावा ही तमाम जनतेच्या मनातील इच्छा आहे, या साठी दोन्ही तालुक्यातील लोकप्रतिनिधीनी बैठक घ्यावी. व त्या मध्ये जात पात, पक्ष, धर्म न पाहता फक्त पाटोदा / शिरूरच्या विकास साठी एक उमेदवार द्यावा व निवडून आणावा. वाढपा जर आपल्या तालुक्यातील असेल तर निश्चितच आपल्याला ओंजळ भर जास्त वाढेल. या आधी आपल्या तालुक्यात ७१ वर्षात अडीच वर्षे आमदारकी मिळाली,आत्तापर्यंत आष्टीने मोठया भावाची भूमिका पार पाडली,गेल्या वेळेस आम्ही मदत केली आता २०१९ ला लहान भाऊ (पाटोदा / शिरूर) ला मदत करावी, २०१९ ला पाटोदयाला संधी द्यावी व पुढील वेळी शिरूर साठी संधी द्यावी, तर पाटोद्याला एक पंचवार्षिक द्यावी उदार मनाने केले तर काही कमी पडणार नाही, दोन्ही तालुक्यातील जनतेने एकत्रित होऊन आपली ताकत दाखवून द्यावी. आता नाही तर नंतर कधीच नाही. सर्वानी जागरुक व्हावे व डोळे उघडून पहा काय आहेत समस्या या दोन ही तालुक्यातील आष्टीला कुकडीचे पाणी तर पाटोदा / शिरूरला थेंब नाही, सर्व सुविधा कॉलेज आष्टीला तर पाटोदा / शिरूर ऊसतोडणीसाठी, कुठे तरी हे बदले पाहिजे, रोजगाराच्या सुविधा उपलब्ध नाहीत, MIDC चालू नाही साखर कारखाना दूध संघ आष्टीला, पाटोदा / शिरूर दुष्काळी व बराचसा भाग डोंगरी असल्याने ऊसतोडल्या शिवाय पर्याय नाही, हे चित्र कुठेतरी बदले पाहिजे हे चित्र बदलण्यासाठी एक मोठा तलाव व शेतकऱ्याच्या शेतापर्यंत कॅनॉल होणे गरजेचे आहे,MPSC स्पर्धा परीक्षा या साठीचे मार्गदर्शन केंद्र, अभ्यासिका, वाचनालय होणे आवश्यक आहे. पाटोदा येथील ग्रामीण रुग्णालयाची गंभीर अवस्था झाली आहे, फक्त निवडणुकी मध्ये मते द्यायला व मते मागायला पाटोदा तालुका, पण पाटोदयाचा जनतेच्या आरोग्याकडे बघायला वेळ नाही, ज्या तालुक्यातील खेळाडू जागतिक पातळीवर सुवर्णपदक मिळवून देणारा पै. राहुल आवारे त्या तालुक्यात क्रीडा संकुल नाही, पाटोदा तालुक्याने देशासाठी १० ते १२ जवान दिले त्यांची प्रेरणा म्हणून एक ही भुमीपुत्र प्रेरणा उद्यान तालुक्यात नाही, पर्यटन स्थळ विकसापासून दूर आहेत, शिरूर तालुक्यात सुद्धा हीच अवस्था आहे. त्या साठी पाटोदा / शिरूरचा २०१९ च्या विधानसभेत आमदार १००% व्हावाच ही सर्वांची इच्छा आहे.
आज घडीला पाटोदा व शिरूर तालुक्यात सर्वच क्षेत्रातील लोकप्रियता असलेले व विकासभिमुख चेहरे आहेत त्या मध्ये जेष्ठ व युवा नेतृत्वाला संधी मिळू शकते, परंतु आष्टीची हुजरेगिरी मुजरेगिरी जेव्हा आपल्या तालुक्यातील कार्यकर्ते नेते बंद करून आपल्याच तालुक्यातील नेतृत्व स्वीकारतील तेव्हाच पाटोदा शिरूरचा लोकप्रतिनिधी होऊ शकतो असे मत पाटोदा शिरूर तालुक्यातील जनते मधुन व्यक्त होत आहे.