पाटोदा (प्रतिनिधी): पाटोदा तालुक्यात भयाण दुष्काळी परीस्थिती असताना सौंदाणा गावचे रहीवाशी दत्तात्रय नामदेव कदम (दिव्यांग ६५%) शेतकरी हे अनुदान मागणीसाठी जिल्हा मध्यवर्ती बॅक शाखा पाटोदा येथे गेले असता सदर बॅकेचे शाखा प्रबंधक कोंबडे यांनी आरेरावी ची भाषा करत तु अपंग (दिव्यांग) नाहीस,तु शेंडी कशाला ठेवली, देवा(बामण) आहेस काय तुला तुझे अनुदान सौंदाणा गावचा नंबर आल्या नंतर मिळेल अशी आरेवाच्च भाषेचा वापर केला असल्याची माहिती मिळत आहे.
सदरील अनुदानाची रक्कम मिळाल्यास दत्तात्रय नामदेव कदम यांना उपचारासाठी दवाखान्यात पाहीजे होती.
रक्कम तर मिळालीच नाही सदर अधिकारी यांच्याकडून अपमानास्पद वागणुक मिळाली आहे. प्रत्येक वेळेस जिल्हा मध्यवर्ती बॅक शाखा पाटोदा येथील अधिकारी याच भाषेत बोलत असतात.
सदर अधिकारी यांच्यावर तात्काळ कार्यवाही व्हावी यासाठी पाटोदा तहसिल येथे दत्तात्रय कदम यांच्या कडून निवेदन देण्यात आले आहे.