सोयगाव,ता.११:ज्ञानेश्वर धोंडू पाटील―
घोसला ता.सोयगाव येथे एकाच कुटुंबातील तिघांचा कोरोना सकारात्मक अहवाल प्राप्त झाला असून घोसला गावात तीन रुग्णसंख्या झाली आहे.पाचोरा जी.जळगाव येथील खासगी प्रयोगशाळेने दिलेल्या एकाच्या सकारात्मक अहवालावरून तालुका आरोग्य विभागाने सोमवारी कुटुंबातील घेतलेल्या लाळेच्या नमुन्यात तीन रुग्ण स्पष्ट झाले आहे.
घोसला परिसरात एकही रुग्णसंख्या नसतांना अचानक गावात तीनरुग्ण झाल्याने खळबळ उडाली आहे.या गावाचा जळगाव जिल्ह्याशी मोठा संपर्क असून पाचोरा कनेक्शन झाल्याचा तालुका आरोग्य विभागाचा अंदाज आहे,गावात रुग्ण आढळताच गटविकास अधिकारी सुदर्शन तुपे,तहसीलदार प्रवीण पांडे,तालुका आरोग्य अधिकारी डॉ.श्रीनिवास सोनवणे आदींच्या पथकांनी तळ ठोकून गावात फवारण्या करण्याबाबत सूचना केल्क्या आहे.ग्रामसेवक साहेबराव मोरे मात्र कोरोना अवतारातच गावात आल्याचे ग्रामस्थांनी सांगितले आहे.
0