परळी दि.१६: आठवडा विशेष टीम―दुष्काळ आणि पाणी टंचाईसारखी भीषण परिस्थिती भविष्यात उदभवू नये म्हणून सध्या राज्यभर वॉटर कप स्पर्धेमार्फत लोकसहभागातुन जलसंधारणाची कामे मोठ्या प्रमाणात सुरु आहेत. वॉटर कप स्पर्धेत सहभागी गावांचा उत्साह आणि लोकसहभाग वाढवण्यासाठी खा.डॉ.प्रितमताई मुंडे परळी तालुक्यातील लिंबोटा येथे सकाळी ७ . वा तर भतानवाडी येथे सकाळी ८.३० वा सहभागी होऊन श्रमदान करणार आहेत .
दुष्काळ आणि पाणी टंचाईच्या झळांना भविष्यात तोंड देण्याची वेळ येऊ नये म्हणून स्वयंस्फूर्तीने लोक मोठ्या प्रमाणात वॉटर कप स्पर्धेत सहभागी होऊन श्रमदान करत आहेत.
वॉटर कप स्पर्धा लोकसहभागातुन लोककल्याणाचा वेध घेणारी असून दुष्काळाशी दोन हात करणाऱ्या जलदूतांचा उत्साह वाढवण्यासाठी खा.डॉ.प्रितमताई मुंडे आज लिंबोटा आणि भतानवाडी येथे श्रमदान करणार आहेत. खा.प्रितमताईंच्या श्रमदान आणि सहभागाने जलदूतांसह सहभागी गावकऱ्यांचा उत्साह वाढणार आहे.