सोयगाव: टँकरग्रस्त गावातील नागरिक पंचायत समितीवर ,सोयगाव तालुक्यात टँकरचे नियोजन होत नसल्याचा आरोप

आठवडा विशेष | ज्ञानेश्वर धोंडू पाटील
सोयगाव दि.१६: तालुक्यात पाणीटंचाईने त्रस्त असलेल्या गावांमध्ये प्रशासनाच्या वतीने पाठविण्यात आलेल्या ठरावानुसार सात गावांना तब्बल अकरा टँकरची मंजुरी देण्यात आली असतांनाही पंचायत समितीच्या अकार्यक्षम नियोजनामुळे नागरिकांच्या घशात जात नसल्याने गुरुवारी काही गावातील ग्रामस्थांनी पंचायत समिती कार्यालयावर धाव घेतली असता,आउट घटकेच्या गटविकास अधिकाऱ्याकडून तहानलेल्या ग्रामस्थांकडून समाधानकारक उत्तर मिळाले नसल्याने तहानलेल्या ग्रामस्थांचा पारा वाढला होता.
जिल्हाधिकारी कार्यालयाकडून मंजूर करण्यात आलेल्या अकरा टँकरच्या मंजुरी आदेश तहसील प्रशासनाने पंचायत समितीला देवून संबंधित टंचाईग्रस्त गावांना टँकरही सुरु करण्यात आले,परंतु प्रभारी गटविकास अधिकाऱ्याचे सुरु असलेल्या गावातील टँकरवर नियोजन नसल्याने ग्रामस्थांच्या घशापर्यंत पाणी पोहचत नसल्याने संतप्त ग्रामस्थांनी थेट पंचायत समिती कार्यालय गाठून याबाबत किफायत मांडली.परंतु यावर उपाय योजना म्हणून प्रभारी गटविकास अधिकारी यांनी कारणे दाखवाचे उत्तर देवून तहानलेल्या ग्रामस्थांच्या तोंडाला पाने पुसली आहे.दरम्यान एकीकडे सोयगाव तालुक्यात पाणीटंचाईचे संकट गहन होत असतांना,दुसरीकडे मात्र पंचायत समितीच्या संबंधित विभागाकडून केवळ खोटा अहवाल तयार करून पाणीटंचाई नसल्याचे भासाविल्या जात आहे.सोयगाव तालुक्यात तब्बल ७० च्यावर गावे टंचाईचं विळख्यात अडकली असतांना पंचायत समितीकडून दुष्काळातील पाणीटंचाईला सोयीस्करपणे बगल दिल्या जात असल्याचा आरोप तहानलेल्या ग्रामस्थांचा आहे.
सोयगाव पंचायत समितीच्या प्रभारी गटविकास अधिकाऱ्याला तालुक्यातील पाणीटंचाईची अभ्यासपूर्ण माहितीच नसल्याने पाणीटंचाईवर गोंधळ उडाला आहे.पंचायत समितीच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या आमखेडा गावातील पाणीटंचाई वर उपाय योजनांसाठी मात्र गटविकास अधिकारी अपयशी ठरल्याने अखेरीस या प्रकरणावर त्यांनी कारणे दाखवा पर्याय वापरून पाणीटंचाईवर पडदा टाकला आहे.दरम्यान हाकेच्य अंतरावर असलेल्या गावातच ही स्थिती उद्भवली आहे तर उर्वरित तालुक्याची स्थिती काय असेल याचा अंदाज बंधने कठीण झाले आहे.
थेंबभर पाणी द्या,तहानलेल्या नागरिकांची आर्त हाक-
दरम्यान आम्हाला पिण्यासाठी थेंबभर पाणी द्या अशी आर्त हाक देत तहानलेल्या ग्रामस्थांनी गटविकास अधिकाऱ्याच्या दालनात घुसून चक्क प्रभारी गटविकास अधिकार्यांना केली होती,त्यामुळे तालुक्यातील गंभीर पाणीटंचाई चा अंदाज आला असतांना सुद्धा पंचायत समितीकडून मंजुरी दिलेल्या टँकरचे नियोजन केल्या जात नाही.
उपमुख्यकार्यकारी अधिकारी मात्र शांत-
दरम्यान घोटभर पाण्यासाठी ग्रामस्थ गटविकास अधिकार्यांना टँकरचे नियोजन करून आमच्या कुटुंबियांना थेंबभर पाणी द्या अशी आर्त विनवणी करत असतांना गटविकास अधिकाऱ्याच्या दालनात बसलेल्या जिल्हा परिषदेच्या उपमुख्यकार्यकारी अधिकारी मात्र या प्रश्नावर निमूटपणे शांत बसलेल्या आढळल्याने पाणीटंचाईचं प्रशासनात मी नाहीच असेही त्यांनी स्पष्टपणे तहानलेल्या ग्रामस्थांना दर्शविले.