पाटोदा तालुकाबीड जिल्हाब्रेकिंग न्युज

बांधकाम व इतर कामगारांच्या हक्काच्या मागण्यांसाठी पाटोदा तहसीलवर कामगारांचा धडक मोर्चा धडाडला

पाटोदा (गणेश शेवाळे): पाटोदा तालुक्यात सध्या भयाण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असल्याने पाटोदा तालुक्यातील गवंडी, मिस्त्री,बांधकाम मजूर व ईतर सर्व कामगार याना हाताला काम नसल्याने त्याच्या कुटुंबीयांना ऊपासमारीची वेळ आलेली आहे शासनाने ईमारत बांधकाम व ईतर कामगारांना रोजगार उपलब्ध करून द्यावा व शासनाने कामगारांना कामगार कल्याण मंडळाच्या माध्यमातून विविध योजना नोंदणीकृत बांधकाम कामगाराला त्वरित मंजूर करून देण्यात यावे यासाठी गुरुवार दि. 16/5/2019 या दिवशी पाटोदा तहसील कार्यालयावर बांधकाम कामगार व ईतर कामगार यांचा मोर्चा पाटोदा तहसीलवर धडाडलालला यावेळी मजुर संघटनेचे अध्यक्ष सय्यद सलीम, ऊपाध्यकष सय्यद आजीम, पठान हमीद,सय्यद साजेद यानी या मोर्चाचे नेतृत्व केले खालील मागण्यासाठी बांधकाम कामगारचा मोर्चा तहसीलवर निघाला त्या प्रमुख मागण्या कामगाराने नोंदणी केली आहे त्या कामगारांना दुष्काळात काम नसल्याने सरसकट वीस हजार रूपये आथिर्क मदत करावी.बोगस कामगाराची नोंद बंद करावी.नवीन नोदनी तात्काळ सुरू करावी.कामगाराची घरकुल योजना त्वरित मंजूर करावी.कामगारांच्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक सवलती व आथिर्क सहाय्य यांची अंमलबजावनी करावी.ज्या बांधकाम कामगारानी विवाह झालेल्याची फार्म भरून दिले आहे त्याना तात्काळ अनुदान देण्यात यावा.ज्या कामगारा च्या पत्नी प्रस्ततीसाठी अर्ज केला आहे त्याचे अर्थसहाय्य त्वरित देण्यात यावे . कामगार हा अङानी असल्यामुळे त्याला शासकीय योजना माहीत नसत्यात त्यामुळे सदर कार्यालयातील अधीकार्याने तालुकास्तरावर शिबीर घेऊन फार्म भरून घ्यावे. कामगारास 90 दिवस काम नसल्यास त्याना शासनाच्या नियमानुसार आर्थिक मदत देण्यात यावी. कामगारांना साहित्यासाठी शासनाने दिलेली रक्कम अर्ज भरणाऱ्याना त्वरित देण्यात यावी.ईत्यादी मागण्यासाठी खालील बांधकाम कामगार मोर्चास उपस्थित होते ईसाक मिस्री,जलील मिस्री, साहेबा मिस्री, बळी मिस्री, अनीस मिस्त्री,फारोक मिस्त्री,मशरू मिस्त्री, आप्पा मिस्त्री,फय्याज मिस्त्री, वाहेद मि.जाहेद मि. हाजु मी.युवराज मि.जावळे मी. यांच्या सह शेकडो कामगार व मिस्त्री सहभागी होते. या मोर्चाला शेतकरी नेते राजाभाऊ देशमुख,अँड जब्बार पठान,कॉग्रेस नेते ऊमर चाऊस,समद भाई, नगरसेवक संदीप जाधव, विजय जोशी, नय्युम पठाण,कॉग्रेस तालुकाध्यक्ष गणेश कवडे,मनसे तालुकाध्यक्ष नामदेव सानप, दिव्याग संघटनेचे अध्यक्ष शेख जिलानी,सय्यद मतीन, संत वामनभाऊ टेडर्स यांनी या मोर्चास पाठिंबा देऊन आपले मनोगत व्यक्त केले.

बातमी बद्दल तुमच्या प्रतिक्रिया लिहा

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.