अकोट : सध्या शहरात दिवसेंदिवस उन्हाची चाहूल अकोट करांना लागत आहे. सुर्याची प्रखर किरण पडू लागल्यामुळे प्रत्येकजण उन्हापासून संरक्षण करण्याच्या उपाययोजना करत आहे. रसवंती, शितपेय यांना सर्वाधिक पसंती मिळत असून सध्या तरूण, तारूणी गोल्याला सर्वाधिक पसंती दर्शवित आहे. उन्हाची तीव्रता वाढत जावून तहान वारंवार लागते. नुसतीच पाणी पिऊन तहान लागत नाही तर मग ऊसाचा रस, फळांचा रस,शितपेय, शरबत इ.पिण्याचे प्रमाण वाढत आहे. त्याचप्रमाणे शहरासह ग्रामीण भागात उन्हाची चाहूल लागत असून ठिकठिकाणी गोले विक्रेता दाखल झाले आहेत. सध्या उन्हाचे नियंत्रण करण्यापासून अननस, मोसंबी, टरबूज, आईसक्रीम पाल॔र त्याचप्रमाणे रंगीबेरंगी गोल्यासाठी सर्वाधिक आकर्षण होतांना दिसत आहे. उन्हाळयात आईस गोल्यास सर्वाधिक आरोग्यास हितकारक असल्यामुळे उन्हाची तहान भागविण्यासाठी गोला सहज शहरात विविध ठिकाणी मिळत असल्यामुळे गोल्यासाठी शहरात सर्वात जास्त मागणी होतांना दिसून येत आहे. उन्हाळयात तोंडास कोरडे पडणे तसेच कितीही पाणी प्यायले तरी तृप्ती न होणे. उन्हामुळे आवाज खोल जाणे, घसा ओढवणे ,जिभ खरखरणे, थकवा येणे इ.प्रकार होत असतात म्हणुन उन्हापासून संरक्षण करण्यासाठी रुमाल, गाॅगल्स, टोप्या, शितपेय, आईसक्रीम पाल॔र, ज्युस सेंटर, मोसंबी, टरबूज, काकडी,कैरी इ.फळे शहारासह ग्रामीण भागात उन्हाची चाहूल लागल्यापासून विक्रीसाठी ठिकठिकाणी दाखल झाले आहेत. यांना सध्या मोठया प्रमाणावर मागणी दिसून येत आहे.