शासनाला शेतकर्‍यांचे व दुष्काळाचे गांभीर्य नाही―आ.बसवराज पाटील

छावण्या नाहीत तेथे चारा डेपो सुरू करा-राजकिशोर मोदी

काँग्रेस पक्षाच्या पथकाने केली बीड जिल्ह्यातील दुष्काळाची पाहणी

अंबाजोगाई : आठवडा विशेष टीम―मराठवाड्यातील जनता दुष्काळात होरपळ असतानाही शासनाला शेतकर्‍यांचे व दुष्काळाचे कसलेही गांभीर्य नाही.पाणी, चारा यांची स्थिती भयावह बनली आहे. छावणी चालकांचे प्रश्न सुटले नाहीत फळबागा पाण्याअभावी जळाल्या पिण्याच्या पाण्याच्या टँकरची संख्या वाढवली जात नाही,अशा अनेक समस्यांचा फटका बीड जिल्हा वासियांना सहन करावा लागत आहे. सरकारने ही उदासिनता झटकून तात्काळ उपायोजना न आखल्यास काँग्रेस पक्षाच्या वतीने तिव्र आंदोलन छेडण्याचा इशारा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे मुख्य प्रतोद तथा सरचिटणीस आ.बसवराज पाटील यांनी दिला.तर यावेळी छावण्या नाहीत तेथे तात्काळ चारा डेपो सुरू करा,जनतेला पिण्याचे शुद्ध पाणी व जनावरांसाठी पुरवठा करा,छावणी चालकांच्या समस्या सोडवा,शेतकर्‍याला मदतीचा हात द्या, रोजगार हमीची कामे सुरू करा आदी मागण्या पाहणी दौर्‍याच्या निमित्ताने बीड जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजकिशोर मोदी यांनी केल्या.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रांत अध्यक्ष खा.अशोकराव चव्हाण यांच्या सुचनेवरून मराठवाडा विभागातील औरंगाबाद,जालना,बीड व उस्मानाबाद या जिल्ह्यांसाठी एक समिती गठीत करण्यात आली आहे.या समितीचे अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे मुख्य प्रतोद तथा सरचिटणीस आ.बसवराज पाटील व काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते यांनी गुरूवार,दि.16 मे रोजी बीड जिल्ह्यात दुष्काळ पाहणी दौरा केला.सायंकाळी 5 वाजता नांदुर हवेली (ता.जि.बीड) येथे आगमन झाले.यावेळी त्यांचे सोबत समिती सदस्य माजी आ.सुरेश जेथलिया,सेवादलाचे प्रदेशाध्यक्ष विलासराव औताडे,माजी आ.अशोकराव पाटील, समिती समन्वयक भिमराव डोंगरे,बीड जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजकिशोर मोदी,अ‍ॅड.विष्णुपंत सोळंके,दादासाहेब मुंडे,बीड तालुकाध्यक्ष महादेव धांडे,शाहदेव हिंदोळे,अ‍ॅड.कृष्णा पंडीत,अ‍ॅड.राहुल साळवे,शेख सिराज, इद्रिस हाश्मी, सेवादलाचे जिल्हाध्यक्ष योगेश शिंदे,राजीव गांधी पंचायतीराज संघटनचे जिल्हाध्यक्ष राणा चव्हाण, कचरूलाल सारडा, गणेश मसने,औदुंबर मोरे,रणजित पवार, आश्विन सावंत,विशाल पोटभरे,भारत जोगदंड, रणजित हारे,शेख खलील,अमोल मिसाळ आदींसहीत काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते, पदाधिकारी व दुष्काळग्रस्त भागातील शेतकरी उपस्थित होते.
या पाहणी दौर्‍यात दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांशी चर्चा करण्यात आली. दुष्काळा बाबतची माहिती घेतली सायंकाळी 6 वाजता कामखेडा (ता.जि.बीड) येथे सुरू असलेल्या चारा छावणीस आ.बसवराज पाटील व इतर सर्व नेते यांनी भेट दिली.तर सायंकाळी 7 वाजता बिंदुसरा धरण प्रकल्पाची पाहणी करून परिसरातील शेतकर्‍यांशी चर्चा केली. यावेळी बीड जिल्ह्यातील दुष्काळाचा आढावा घेतला. दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांच्या व्यथा, वेदना जाणून घेवून दुष्काळी परस्थितीत नेमक्या कोणत्या उपाययोजना कराव्या लागतील,नागरिकांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था,जनावरांसाठी चारा व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, रोजगार,चारा छावणीच्या अडचणी याबाबतची माहीती घेतली.महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने महाराष्ट्रातील दुष्काळाची पाहणी करण्यासाठी आ.बसवराज पाटील यांच्या नेतृत्वाखालील पथकाने गुरूवारी बीड जिल्ह्यातील विविध गावांना व छावण्यांना भेट दिली.यावेळी आ. पाटील व त्यांच्या पथकाने बीड तालुक्यातील नांदुर हवेली येथील शेतकर्‍यांशी संवाद साधला.तसेच या परिसरातील जळालेल्या व वाळलेल्या फळबाग यांची पाहणी केली. कामखेडा येथे गुरांच्या छावणीला भेट दिली. बिंदुसरा प्रकल्पास भेट देवून पाणी पातळीची पाहणी केली तसेच शेतक-यांशी संवाद साधला,छावणी चालक व शेतकरी यांच्या समस्या जाणून घेतल्या, यावेळी उपस्थित शेतकरी रामदास महाराज,दगडु बुधनर, गणेशराव निवडे,लाला घुगे,दादासाहेब मुंडे या शेतकर्‍यांनी दुष्काळाबाबतची माहिती काँग्रेसच्या पथकाला दिली.यावेळी प्रास्ताविक करताना राजकिशोर मोदी यांनी शेतकर्‍यांच्या,गुरांच्या चा-याचा प्रश्न गंभीर बनला आहे.तसेच छावणी चालकांना अद्यापही अनुदान मिळाले नाही.अनुदान देण्यापेक्षा त्यांच्या तपासण्याच सुरू ठेवून त्यांना त्रस्त केले आहे. अगोदर अनुदान द्या मग तपासण्या करा अशी मागणी मोदी यांनी केली तर सुरेश जेथलिया यांनी काँग्रेस पक्ष शेतकर्‍यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. छावणी चालकांचे प्रश्न विधिमंडळाच्या माध्यमातून सोडविणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. जिल्हा प्रभारी भिमराव डोंगरे,विलासराव औताडे,अशोकराव पाटील आदींनी मनोगत व्यक्त केले.यावेळी बीडचे तालुकाध्यक्ष महादेव धांडे यांनी सुत्रसंचालन करून उपस्थितांचे आभार वशिष्ठ बडे यांनी मानले.

छावण्या नाहीत तेथे चारा डेपो सुरू करा-राजकिशोर मोदी

बीड जिल्ह्यात दुष्काळाची तिव्रता दिवसेंदिवस वाढत आहे.ग्रामिण भागात दुष्काळाची स्थिती दिवसेदिवस भयावह बनत आहे.बीड जिल्ह्यात ज्या ठिकाणी चारा छावण्या नाहीत अशा ठिकाणी चारा डेपो सुरू करावेत व या माध्यमातून शेतक-यांना चारा उपलब्ध करून द्यावा,रोजगार हमीची कामे सुरू करावीत,बीड जिल्ह्यात दुष्काळी भागातील शेतक-यांच्या मागणीनुसार सरकारने बंधारे,बॅरेजेस बांधावेत अशी मागणी बीड जिल्हा काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष राजकिशोर मोदी यांनी केली.बीड जिल्ह्यातील जनतेला टँकरद्वारे सुरू असलेला पाणी पुरवठा अशुद्ध आहे.तो शुद्ध करावा अशी मागणी त्यांनी केली.तसेच दुष्काळात
होरपळणा-या जनतेला शासनाने तात्काळ मदतीचा हात द्यावा, छावणी चालकांच्या समस्या तात्काळ सोडवाव्यात अशी मागणी मोदी यांनी केली.


Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.