कोरोना विषाणू - Covid 19बीड जिल्हाब्रेकिंग न्युजविशेष बातमी

अधिकारी व कर्मचारी यांच्यासह विविध परवानग्या घेणाऱ्या सर्व अर्जदार नागरिकांना आरोग्य सेतु अॅप डाऊनलोड करणे बंधनकारक – जिल्हाधिकारी राहुल रेखावार

बीड, दि.२६:आठवडा विशेष टीम― कोरोना विषाणु पासुन स्वत:चा बचाव करण्यासाठी आरोग्य सेतु मोबाईल अॅप अतिशय महत्वाचे असल्याने सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी आरोग्य सेतु मोबाईल अॅप तात्काळ डाऊनलोड करावे. तसेच विविध परवानग्या मागण्यासाठी येणाऱ्या सर्व अर्जदार नागरिकांना आरोग्य सेतु अॅप डाऊनलोड करणे बंधनकारक करण्यात आले आहे असे आदेश अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण तथा जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी जिल्ह्यातील सर्व विभाग प्रमुख यांना दिले आहेत.
कोरोना विषाणु पासुन स्वत:चा बचाव करण्यासाठी आरोग्य सेतु मोबाईल अॅप अतिशय महत्वाचे असल्याने सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी आरोग्य सेतु मोबाईल अॅप तात्काळ डाऊनलोड करावे. तसेच विविध परवानग्या देण्यासाठी नेमण्यात आलेल्या नियंत्रक अधिकारी यांनी परवानगी मागण्यासाठी येणाऱ्या सर्व अर्जदार यांना आरोग्य सेतु अॅप डाऊनलोड करणे बंधनकारक करावे व त्यांनी ते केल्याबाबत आपलेस्तरावर खात्री करावी.
जिल्ह्यात कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्याच्या दृष्टीने प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी साथरोग प्रतिबंधक कायदा 1897 विविध आदेश सुधारणा आदेश लागू आहेत या अधिसूचना व नियमावलीमधील तरतुदी व या आदेशाची अवाज्ञा करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीने अथवा संस्थेने भारतीय दंडसंहिता 1860 (45) याच्या कलम 188 शिक्षेसपात्र असलेला अपराध केला असे मानण्यात येईल आणि दिवाणी व फौजदारी कार्यवाही करण्यात येईल.

Back to top button