सामाजिक

सोयगाव-घोसला येथील समाजभूषण तरुणाला मुंबईत पुरस्काराने सन्मानित,आमदार आमदार नरेंद्र मेहता यांच्या हस्ते पुरस्कार

सोयगाव| प्रतिनिधी दि.२० जानेवारी २०१९:

सोयगाव तालुक्यातील दुष्काळाची दाहकतेचे गांभीर्य लक्षात घेवून मुंबईत कामानिमित्त गेलेल्या सोपान गव्हांडे रविवारी मुंबईत सपत्नीक राज्य शासनाच्या खानदेशा मराठा पुरस्काराने आमदार नरेंद्र मेहता यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
सोयगाव तालुक्यातील दुष्काळाने होरपळलेल्या नागरिकांचे अश्रू पुसून मराठा प्रतिष्ठानच्या माध्यमातून त्यांना मदतीचा हात दिला.पाणीटंचाईने होरपळनाऱ्या गावांना पाणी टँकर सुविधा मोफत देवून दुष्काळात प्रशासनाच्या आधी ग्रामीण भागात पोह्चानार्या समाजमन ओळखणाऱ्या सोपान गव्हांडे यांच्या कार्याची मीराभाईंदर येथील आमदार नरेंद्र मेहता यांनी दखल घेवून त्यांना रविवारी आयोजित खासगी कार्यक्रमात खानदेशा मराठा भूषण पुरस्काराने सपत्नीक सन्मानित केले.यावेळी नगरसेविका सोनार,सविता गव्हांडे,संजय पाटील,बाळासाहेब मोहने,सागर शिंदे,आदींची व्यासपीठावर उपस्थिती होती,दरम्यान त्यांच्या पुरस्काराची माहिती मिळताच घोसला गावात फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली,यावेळी मराठा प्रतिष्ठानचे जिल्हाध्यक्ष विजय काळे,ज्ञानेश्वर युवरे,ज्ञानेश्वर गवळी,ज्ञानेश्वर जुनघरे,अमोल बोरसे,समाधान घुले भरत पगारे,समाधान जाधव,प्रमोद वाघ,गुणवंत पाटील,प्रकाश गव्हांडे,समाधान शिंदे,आदींनी जल्लोष केला.

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.