आठवडा विशेष | ज्ञानेश्वर धोंडू पाटील
सोयगाव,ता.१९:निंबायतीसह रामपुरातांडा,निंबायती गाव,न्हावीतांडा आणि या चार गावांना तब्बल महिनाभरापासून थेट धरणाच्या मृतसाठ्यातून होणाऱ्या दुषित पाणीपुरवठ्याने ग्रामस्द्थांचे आरोग्य धोक्यात आले आहे.दरम्यान ग्रामपंचायत प्रशासनाने याबाबत विहीर अधिग्रहण करून गावाला पाणी पुरवठा करण्याची मागणी जोर धरत आहे.
धिंगापूर धरणाच्या मृतसाठ्यातून थेट योजनेमार्फत निंबायतीचं चार गावांना दुषित पाण्याचा पुरवठा होत आहे.यामुळे चार गावांमध्ये पोटाचे विकार वाढल्याने रुग्णसंख्या वाढली आहे.दरम्यान या चारही गावांना पाणी पुरवठ्यासाठी विहीर अधिग्रहण करून पाणी पुरवठा करावा अशी मागणी बाधित ग्रामस्थांनी केली आहे.थेट धरणाच्या पाण्यातून रुग्णांना बाधा झाल्याने खासगी दवाखाने फुल झाले असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.निंबायती ग्रामपंचायतीच्या पुरवठा योजनेवरून चार गावांना पाणी पुरवठा करण्यात येतो,परंतु यंत्रणा कार्यान्वित असलेल्या धिंगापूर धरणात केवळ मृतसाठा शिल्लक असल्याने संबंधित विभागाकडून मृतसाठ्यातून थेट गावाला पाण्याचा पुरवठा चालू असल्याने ग्रामस्थांना दुषित पाणी पिण्याचे वेळ आली आहे.
गावातील असलेली यंत्रणेच्या साठवण टाक्याही गाळाने फुल झाल्या असल्याने साठवण टाक्याही तब्बल दोन महिन्यापासून स्वच्छ करण्यात आल्या नसल्याचे प्रभाकर शिंदे,लक्षमण झाल्टे,नितीन शिंदे यांनी सांगितले यामुळे दुषित पाण्यासोबतच साठवण टाक्यातील दुर्गंधीयुक्त पाणी ग्रामाथांच्या थेट पिण्यात येत असल्याचा आरोप ग्रामपंचायत सदस्य शमा तडवी यांनी केला आहे.