औरंगाबाद जिल्हाब्रेकिंग न्युजसोयगाव तालुका

सोयगाव: अंगणात खेळणाऱ्या बालकांच्या अंगावर वीजतार कोसळली,घोसल्यातील घटना

आठवडा विशेष | ज्ञानेश्वर धोंडू पाटील

सोयगाव:अंगणात खेळणाऱ्या बालकांच्या चमूवर मुख्य वीजपोलच्या तारेवर झालेल्या अचानक शोर्टसर्किटमुळे वीजतार अंगावर कोसळल्याची घटना रविवारी रात्रीच्या सुमारास घोसला ता.सोयगाव येथे घडली,दरम्यान ग्रामस्थांनी तातडीने धाव घेतल्याने या पाचही बालकांना गंभीर दुखापत झाली नसल्याचे घटनेनंतर स्पष्ट झाले आहे.
मुख्य वीजपोलवर शोर्टसर्किट होवून तुटलेली प्रवाहरहित वीजतार अंगणात खेळणाऱ्या बालकांचा अंगावर कोसळल्याने घोसला गावात मोठी धावपळ झाली होती.चेतन गव्हांडे,रोशनी बावस्कर,रोहिणी बावस्कर,मोहित बावस्कर,दिपाली ढमाले,सृष्टी बावस्कर ही बालके अंगणात खेळत असतांना अचानक वीज पोलवर शोर्टसर्किट झाल्याने मुख्य प्रवाह असलेली वीजतार या बालकांच्या अंगावर कोसळल्याचे अंगणात बसलेल्या काही ग्रामस्थांच्या लक्षात येताच तातडीने या ग्रामस्थांनी बालकांच्या चामुकडे धाव घेत त्यांना या घटनेतून वाचविले,दरम्यान ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे पुढील अनर्थ टळला,परंतु या घटनेमुळे गावात घबराट निर्माण झाली होती.दरम्यान या घटनेनंतर गावाचा तासभर वीज पुरवठा खंडित झाला होता,घटनेची माहिती मिळताच वीज मंडळाचे पथक गावात धडकल्यावर या पथकांनी वीज पुरवठा सुरळीत करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत हाती घेतलं होते.

घोसला गावात तांत्रिक राहतच नसल्याचं तक्रारी-

दरम्यान घोसला ता.सोयगाव गावाला वीजवितरणचा लाईनमन हजार राहत नसल्याने ग्रामस्थांच्या तक्रारी कोणाकडे कराव्या असा प्रश्न ग्रामस्थांनी व्यक्त केला असून,ऐन दुष्काळात घोसला गावात अवेळी वीज पुरवठा खंडित होण्याचं घटनांमध्ये वाढ झालेली आहे. गावातील वीज देयकांचा प्रश्न प्रलंबित राहिला आहे.त्यातच वीज तार तुटूनही वीज वितरण मंडळाकडून वीज वसुलीचा प्रश्न उपस्थित केल्या गेल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.गावात दुष्काळी स्थितीत कायमस्वरूपी लाईनमन देण्याची मागणी गुणवंत पाटील,गणेश गव्हांडे,प्रकाश पाटील,गोकुळ गवळी,किशोर बावस्कर,विष्णू पाटील,सोपान तायडे,किरण ढमाले,सोमनाथ गव्हांडे आदींनी केली आहे.

बातमी बद्दल तुमच्या प्रतिक्रिया लिहा

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.