महसुल तहसिलदाराच्या आदेशला विभागीय वनअधिकार्यांकडून केराची टोपली
बीड: ऊन-वारा-पावसाची भीती न बाळगता वन्य प्राणी वास्तव्य करत असलेल्या रामगड च्या पायथ्याशी व परिसरात प्राणी मात्र तहान भागविण्यासाठी पाण्याच्या शोधात भटंकती करीत आहेत. महसूल तहसिलदार जिल्हाधिकारी कार्यालय बीड यांच्या आदेशाला विभागीय वनअधिकारी यांनी केराची टोपली दाखवली आहे.
याबाबत अधिक माहीती अशी कि ,जिरेवाडी येथे असलेल्या रामगड परिसरात वन प्राण्याची पाण्यासाठी भंटकती होत आहे. अशी तक्रार केली होती व वन्य जीवाच्या संरक्षाणासाठी रामगड परिसरात वन्यप्राण्यासाठी पाणवठे उभारण्याची विनंती माहीती अधिकार कार्यकर्ते निलेश चाळक यांनी जिल्हाधिकारी बीड यांच्याकडे केली होती या विनंतीची आणि तक्रारीची दखल घेत महसूल तहसिलदार जिल्हाधिकारी कार्यालय बीड यांनी विभागीय वनधिकारी बीड यांना दि,16/04/2019 रोजीच्या पञाने कळवले होते कि,जिरेवाडी येथील रामगड जवळ होणार्या वनप्राण्याच्या पाण्याअभावी भंटकती बाबत माहीती अधिकार कार्यकर्ते निलेश चाळक यांनी प्रस्तुत केलेल्या मुद्दयाची तातडीने गांभीर्याने दखल घेवून वस्तुस्थितीची चौकशी करावी व जिरेवाडी येथील रामगड जवळील परिसरात आपण प्रत्यक्ष भेट देवून वन्य जीव पिण्याच्या पाण्यापासून वंचित रहाणार नाही व तिथे तात्काळ पिण्याच्या पाण्याची व्यवस्था होईल या द्रुष्टीने तातडीने नियमानूसार आवश्यक ती कार्यवाही करण्यात यावी असे आदेश महसूल तहसिलदार जिल्हाधिकारी कार्यालय बीड यांनी दिले होते. परंतू आज महीना होऊन पाच दिवस झाले तरी या भागकडे विभायगीय वनधिकारी फिरकलेच नसल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे वन्य प्राण्यासाठी तात्काळ पाण्याची व्यवस्था करण्याची गरजेचे आहे.
पाणी मिळत नसल्याने वन्य प्राण्याचे स्थालांतर
रामगड परिसरात वन्यप्राण्यांना पिण्यासाठी पाणी मिळत नसल्याने वन्यप्राण्याचे बेहाल होत आहेत. अनेक वेळा प्रशासनाकडे विनंती करून ही या भागात प्राण्यासाठी पाण्याची व्यवस्था प्रशासनाने केली नाही येथील वन्य प्राणी पाण्यासाठी भंटकती करत करत दुसर्या भागात जात आहेत.
निलेश चाळक प्राण्यासाठी रोज ठेवतात पाणी
रामगड परिसरात वन्य प्राण्यांची पाण्यासाठी भंटकती होत आहे त्यामुळे प्रशासनाने या ठिकाणी वन्यप्राण्यासाठी तात्काळ पाण्याची व्यवस्था करून वन्यप्राण्यासाठी पाणवठे उभारावेत पंरतू प्रशासनाकडून कोणतीच कार्यवाही होत नसल्याने माहीती अधिकार कार्यकर्ते तथा व्रक्ष मिञ निलेश चाळक यांनी रामगड परिसरातील आपल्या शेतातील घराच्या बाजूला छोट्या हौदामध्ये पक्षांसाठी शेतात फुटलेल्या अर्ध्या रांजणात दररोज सकाळी उठल्यावर हंडाभर पाणी प्राण्साठी ठेवत आहेत.