सोयगाव दि.२१: ज्ञानेश्वर धोंडू पाटील― सोयगावसह तालुकाभर मंगळवारी सूर्याने चक्क आग ओकाल्याने दुपारच्या सुमारास शेतात काम करणाऱ्या चौघांना चक्कर आल्याने अत्यवस्थ झाले असून शहरातील आठवडे बाजारात एकाला भोवळ आल्याची घटना घडली.दरम्यान या घटनेतील पाचही जणांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यापैकी चौघांची प्रकृती स्थिर असल्याचे खासगी वैद्यकीय सूत्रांनी सांगितले.
सोयगाव तालुक्यात तीन दिवसापासून वाढत्या उष्णतेने कहर केला आहे.मंगळवारी तापमानाने या महिन्यातील सर्वात मोठा उचांक गाठला असून सोयगाव ४३ अंशवर पोहचले असल्याची माहिती तहसील प्रशासनाने दिली.दरम्यान स्वच्छ आकाश असलेल्या सोयगावची सकाळी ५८ टक्के असलेली सापेक्ष आर्द्रता दुपारी ३० टक्क्यावर येवून पोहचली होती.वाढत्य तापमानात वायव्य दिशेकडे जाणाऱ्या वाऱ्याचा वेगही मंदावला असल्याने ताशी १० कि.मी याप्रमाणे वाऱ्याचा वेग असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.दरम्यान महिन्यातील सर्वात उच्चांकी तापमान जिल्ह्यात सोयगावला नोंदविल्या गेले आहे.या वाढत्या उष्णतेच्या तडाख्यात पाच जण होरपळले असल्याने तालुक्यात भीतीचे वातावरण पसरले आहे.