बीड काँग्रेसकडून दिवंगत राजीव गांधींना पुण्यतिथी निमीत्त अभिवादन

राजीव गांधींमुळे भारतात विज्ञान व तंञज्ञान क्षेञात प्रगती-राजकिशोर मोदी

अंबाजोगाई:आठवडा विशेष टीम― दिवंगत राजीव गांधी यांनी देशाचे पंतप्रधान म्हणुन विज्ञान,माहीती व तंञज्ञाना बाबतीत घेतलेले निर्णय हे देशात क्रांती घडवुन गेले असे प्रतिपादन बीड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राजकिशोर मोदी यांनी केले.दिवंगत राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित अभिवादन कार्यक्रमात ते बोलत होते.

अंबाजोगाई पिपल्स बँकेच्या सहकार भवन सभागृहात मंगळवार, दिनांक 21 मे रोजी आयोजित अभिवादन कार्यक्रमात बोलताना राजकिशोर मोदी पुढे म्हणाले की,संगणक, इंटरनेट सेवेसह माहिती, विज्ञान व तंत्रज्ञान भारतामध्ये आणण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे.दिवंगत इंदिराजी गांधी,राजीव गांधी यांच्या बलिदानावरच आधुनिक भारताच्या प्रगतीची इमारत उभी राहीली असल्याचे त्यांनी नमुद केले.काँग्रेस पक्ष व दिवंगत राजीव गांधी यांचे सर्वधर्म समभाव,सहिष्णुता व विज्ञानासंबधीचे विचार जोपासुन ते तळागाळापर्यंत पोहचविण्याचे काम काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी करावे असे आवाहनही जिल्हाध्यक्ष मोदी यांनी याप्रसंगी केले.यावेळी काँग्रेसचे शहराध्यक्ष तथा नगरसेवक महादेव आदमाने,नगरसेवक मनोज लखेरा, नगरसेवक सुनिल व्यवहारे,राजीव गांधी पंचायतीराज संघटनचे जिल्हाध्यक्ष राणा चव्हाण,रणजित पवार, खंडेराव टेमकर,माजी नगरसेवक दत्तू कांबळे, विशाल पोटभरे,महेश परदेशी,अनिल औचित्ये यांचेसह एनएसयुआय, युवक काँग्रेसचे पदाधिकारी,कार्यकर्ते, उपस्थित होते.यावेळी दिवंगत राजीवजी गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक काँग्रेसचे शहराध्यक्ष महादेव आदमाने यांनी केले.तर कार्यक्रमाचे सुञसंचालन राणा चव्हाण यांनी करून उपस्थितांचे आभार रणजित पवार यांनी मानले.


Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.