अकोला जिल्हाब्रेकिंग न्युज

शिल्पकार वानखडे यांची प्राणी शिल्पे स्थापित होणार अमरावती जिल्ह्यात

अकोला: आठवडा विशेष टीम―पर्यावरण रक्षणासाठी अभिनव उपक्रम अकोला - महानगरातील राजीव गांधी नगर येथील आपल्या कार्यशाळेत माती, फायबर व तत्सम साहित्याने अप्रतिम शिल्प निर्माण करणाच्या विशाल वानखडे या युवकाची प्राणी शिल्पे आता थेट अमरावती जिल्ह्यातील अचलपूर येथील वनात पर्यावरण व प्राणी संवर्धनासाठी सामाजिक वनीकरण विभागाच्या माध्यमातून स्थापित करण्यात येणार आहेत.
विशाल वानखडे यांनी अप्रतिम रानटी गवे,चितळ,काळवीट,वाघ,अस्वल,माकड,घोडा,आदी शिल्पे निर्माण केली आहेत.अगदी हुबेहूब जिवंत वाटणारी ही शिल्पे दर्शकांना आकर्षित करतात. याच कारणाने त्यांच्या शिल्पांना शासकीय स्तरावरून जास्त मागणी मिळत आहे.शिल्पकार विशाल वानखडे आपल्या कसबी हातांनी सुरेख,अप्रतिम व साक्षात जिवंत दिसणारी शिल्पे निर्माण करतात.

मुंबईच्या जे जे आर्ट मधून फाईन आर्ट ची पदवी संपादन करणाच्या विशाल वानखडे यांनी आजतागायत अनेक अप्रतिम जिवंत वाटणारी शिल्पे निर्माण करून आपल्या कसबी पणाचा परिचय अवघ्या जगाला करून दिला आहे . त्यांची शिल्पे इतर राज्यातही अनेक ठिकाणी स्थापित करण्यात आली आहेत . आपल्या कसबी हातांनी प्रथम चित्राचे स्केच बनवून त्यानंतर त्या चित्राला मातीचा आकार देऊन प्रतिमा बनवली जाते.त्यानंतर त्या शिल्पाचा फायबरचा मोड काढून साचा तयार करण्यात येतो.त्यानंतर कास्टिंग होऊन त्या शिल्पाची घिसाई,फिनिशिंग व कलरिंग करून अप्रतिम शिल्प वानखडे करीत असतात.लहान - मोठ्या आकाराचे शिल्प आपल्या आकाराप्रमाणे वेळही कमी - जास्त निर्मितीसाठी घेतात.साधारण मध्यम आकाराचे शिल्प हे पंधरा दिवसात तयार होते.तर मोठ्या आकाराचे शिल्प दीड महिना आपल्या निर्मितीसाठी घेते.या कसबी कलेत अन्य कलेचे तज्ञही लागतात.या तज्ञांमध्ये वेल्डर,मोल्डर,कास्टिंग,फिनिषर कारागीर आदी वर्ग लागतो.सर्वप्रथम मूर्ती,स्केच व कलरिंग ही शिल्पाची महत्त्वाची बाजू स्वतः वानखडे निभावतात.त्यांच्या राहुल नगर येथील कार्यशाळेत तयार असलेलीअप्रतिम शिल्पे त्यांच्या कलेची साक्ष देतात.दुसऱ्या प्रकल्पातही वानखडे हे बारा फुटी हत्ती,मगर,पानघोडे अशी प्राण्याची अवाढव्य कलाकृती साकार करणार आहेत.त्यांनी आतापर्यंत भगवान बुद्ध,छत्रपती शिवाजी महाराज,डॉ.आंबेडकर आदी महापुरुषांच्या बारा फुटी उंचपुच्या प्रतिमाही साकार करून आपल्या कलेची चुणूक दाखविली आहे . त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांनाही त्याचे हेबेहूब काढलेले शिल्प भेट करून त्याचे कौतुक प्राप्त केले होते.त्यांच्या या कलेचे सर्वत्र कौतुक होत आहे.

बातमी बद्दल तुमच्या प्रतिक्रिया लिहा

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.