सोयगाव,ता.२१:ज्ञानेश्वर धोंडू पाटील―
कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर शनिवारी सोयगावसह तालुक्यात नागरिकांनी स्वयंस्फुर्तीने ग्रामीण भागात बंद पाळला,या बंदमुळे मात्र ग्रामीण लाईफलाईन ठप्प झाली होती.
कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावावर प्रशासनाकडून नियंत्रण करण्यासाठी उपाय योजना चालू आहेत,त्याचाच एक भाग म्हणून जिल्हाधिकारी यांच्या आदेशावरून सामुहिक ठिकाणी न जमता नागरिकांनी कोरोना व्हायरसच्या प्रतिबंधासाठी सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आल्यावर मात्र शनिवार,आणि रविवार या दोन दिवस बंद पाळण्याच्या सूचना प्राप्त झाल्या होत्या,त्यामुळे सोयगावसह तालुक्यातील ग्रामीण बंद पाळण्यात आला.सोयगाव शहरात मात्र कमालीचा शुकशुकाट पसरला होता.शहरातील सर्वच बाजार पेठा,व्यावसायिक दुकाने,आदींनी बंद पाळल्याने शहर बकाल झाल्याचे दिसून आले.ग्रामीण भागातही या बंदमुळे लाईफलाईन ठप्प झाली होती.
जरंडीला बंद-
तालुक्याच्या जवळच असलेल्या जरंडी गावात मात्र पहाटेपासूनच शुकशुकाट पसरला होता.गावात कडकडीत बंद पाळण्यात आला.कोरोना व्हायरस प्रतिबंधासाठी सोयगाव तालुक्यात नागरिकांनी स्वयंस्फुर्तीने बंद पाळला होता.