क्राईमपरळी तालुकाबीड जिल्हाब्रेकिंग न्युज

बीड: परळीत बनावटी देशी, विदेशी दारू कारखान्यावर छापा

परळी वैजिनाथ:आठवडा विशेष टीम― परळी येथील जुन्या थर्मल परिसरात असलेल्या अशोक नगर भागात आज राज्य उत्पादन शुल्क खात्याच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे बोगस दारू तयार करणाऱ्या दारूच्या कारखान्यावर धाड टाकत तब्बल दोन लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.संभाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा भाग येतो राज्य उत्पादन शुल्क अंबाजोगाई येथील पथकाने धाड टाकत ही मोठी कारवाई केली यामध्ये दारू तयार करण्यासाठी वापरले जाणारे रसायन मोठ्या प्रमाणात जप्त केले आहे. कोरोनाव्हायरस पार्श्वभूमीवर जिल्हाभरात लॉक डाऊन सुरू आहे.याच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी दरम्यानही असे कारखाने सुरू असल्याचे आढळून आल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे.आधीच कोरोनाचे संकट उभे असताना अशा कारखान्याच्या माध्यमातून अवैध दारू निर्मिती-विक्री सुरू असल्याने परिसरातील नागरिकांवर संकट उभे ठाकले आहे असे म्हणावे लागेल. यापूर्वीही याठिकाणी संभाजीनगर पोलिसांनी धाड टाकली होती तरीही कारखाना सुरू राहिल्याने अवैध धंदे करणाऱ्यांवर कायद्याचा कुठलाच धाक नसल्याचे दिसून येते. ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभाग बीड निरीक्षक ए एम पठाण,आर डब्लू कडवे, दुय्यम निरीक्षक एस आर आल्हाट,आर ए घोरपडे,ए एन पिकले,बी के पाटिल,सादेक अहमद,के एन डुकरे, आर ए जारवाल,एन बी मोरे,के एस जारवाल या सर्वांनी केली.

Back to top button