सोयगाव,दि.२४:ज्ञानेश्वर धोंडू पाटील― एक लाख रुग्णांचे आरोग्य अवलंबून असलेल्या सोयगाव ग्रामीण रुग्णालयाचा शुक्रवारी ग्रामस्थांच्या तक्रारीवरून पंचनामा करण्यात आला असता,या पंचनामा अहवालात तीनही वैद्यकीय अधिकाऱ्यांसह तीन आरोग्य कर्मचारी गैरहजर आढळले असून,यामध्ये वैद्यकीय अधिकारी डॉ,शंकर कसबे यांची अर्जित रजा असून डॉ.प्रशांत वारकरी हे सतत गैरहजर असल्याचे आढळून आले आहे.
सोयगाव ग्रामीण रुग्णालयाची महिनाभरापासून ढेपाळलेली रुग्णसेवा यामुळे ग्रामस्थांनी केलेल्या तक्रारीवरून पंचायत समितीच्या पथकाकडून रुग्णालयाचा पंचनामा करण्यात आला असता,या पंचनाम्यात तीनही वैद्यकीय अधिकारी गैरहजर आढळून आले असून यासोबतच तीन आरोग्य कर्मचारी गैरहजर असल्याचे पंचनाम्यात नमूद करण्यात आले आहे.सोयगाव ग्रामीण रुग्णालयात १६ मंजूर पदे असून त्यामास्ध्ये तीन वैद्यकीय अधिकारी व उर्वरित आरोग्य कर्मचारी आहे.परंतु सोळा कर्मचाऱ्यांपैकी पंचनाम्यास्दार्म्यान निम्म्याहून अधिक कर्मचाऱ्यांची अर्जित रजा आणि प्रतिनियुक्ती असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे.तसेच आयुषचे वैद्यकीय अधिकारी डॉ रवींद्र चव्हाण यांची शुक्रवारी दिवसपाळी असतांना गर्भवती महिलेच्या प्रसूतीदरम्यान ते गैरहजर असल्याचे पंचनाम्यात नमूद करण्यात आले असून महिलेच्घी प्रसूती चक्क वैद्यकीय अधिकाऱ्याविना झाल्याचा प्रकार उघडकीस आला असल्याने आरोग्य विभागात खळबळ उडाली आहे.सुनील गव्हांडे,वासुदेव खेडकर,योगेश मानकर आणि शिवाजी दौड यांच्या तक्रारीवरून हा पंचनामा करण्यात आला आहे.
प्रसूत महिलेला सेवाच नाही-
दरम्यान गलवाडा येथील प्रसूत महिलेला सोयगाव ग्रामीण रुग्णालयात रुग्णसेवाच मिळाली नसल्याचे पंचनामा पथकाला महिलेच्या नातेवाईकांनी सांगितले असतांना डॉ.रवींद्र चव्हाण यांनी या महिलेकडे फिराकूनही पहिले नसल्याचे नातेवाईकांनी सांगितले.