22 जून रोजी नागपुर येथे पुरस्काराचे वितरण ; कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाकडुन स्वागत व अभिनंदन
अंबाजोगाई :आठवडा विशेष टीम―येथील शिक्षक व सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब सोनवणे यांना प्रतिष्ठेचा डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता पुरस्कार जाहिर झाला आहे.सदर पुरस्काराचे वितरण नागपुर येथे शनिवार, दि.22 जून रोजी दुसरे एकपात्री प्रबुद्ध नाट्य संमेलनात होणार आहे. पुरस्कार जाहिर झाल्याबद्दल महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कल्याण महासंघ व मित्र परिवाराच्या वतीने बाळासाहेब सोनवणे यांचे अभिनंदन होत आहे.
बाळासाहेब सोनवणे हे एक विद्यार्थीप्रिय, अभ्यासू शिक्षक व शिक्षक बांधवांना न्याय मिळवून देण्यासाठी विविध लढे,आंदोलने उभारणारे लढवय्ये शिक्षक नेते म्हणुन ही ते परिचित आहेत. सोबतच गेल्या अनेक वर्षांपासुन ते महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कल्याण महासंघ या संघटनेचे विभागीय अध्यक्ष म्हणुन कार्यरत आहेत.यापुर्वी त्यांनी संघटनेचे परळी तालुकाध्यक्ष,बीड जिल्हा मुख्य संघटक, जिल्हा कार्याध्यक्ष, विभागीय कार्याध्यक्ष, विभागीय सचिव ही पदे भुषविलेली आहेत. सामाजिक क्षेत्रातही त्यांनी उल्लेखनिय कार्य केलेले आहे.त्यांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याची दखल घेवून त्यांना वेळोवेळी अनेक पुरस्कार जाहिर झाले होते.परंतु,सोनवणे यांनी हे सर्व पुरस्कार स्विकारण्यास प्रत्येक वेळी नम्रपणे नकार दिलेला आहे.मोठ- मोठ्या पुरस्कारांची भुरळ पडू न देता कायम पाय जमिनीवर ठेवून वंचित,दु:खित,पिडीत विद्यार्थी,समाजासाठी आणि व्यक्तींसाठी बाळासाहेब सोनवणे हे अखंड कार्य करीत आहेत.अंबाजोगाई शहरातील प्रवर्तनवादी चळवळीत काम करणारे ते एक प्रमुख शिलेदार आहेत.त्यांच्या या सर्वंकष कार्याची नोंद घेवून महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघ व अखिल भारतीय प्रबुद्ध नाट्य परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार,दि. 21 जून रोजी नागपुर येथील संविधान चौक ते भिक्षा भुमी येथे संविधान जागर रॅली काढण्यात येणार आहे.तर शनिवार,दि.22 जून रोजी पवार सभागृह, कुकडे ले-आउट, चंद्रमणीनगर गार्डन समोर नागपुर या ठिकाणी आयोजित दुसरे एकपात्री प्रबुद्ध नाट्य संमेलनाचे उदघाटक अरूण गाडे(अध्यक्ष,कास्ट्राईब महासंघ),संमेलन अध्यक्षा डॉ.वृशाली रणधीर,संमेलन स्वागताध्यक्ष प्रगतीताई पाटील,प्रमुख पाहुणे भिमपुञ टेक्सास गायकवाड,डॉ.
किर्तीपाल गायकवाड,सुधीर शंभरकर,प्रा.रमेश पिसे,भीमराव गणवीर या मान्यवरांच्या हस्ते व प्रमुख उपस्थितीत बाळासाहेब सोनवणे यांना डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे अशी माहिती संयोजक संजय सायरे,महेंद्र माणके व सिद्धार्थ उके यांनी सोनवणे यांना पाठविलेल्या पत्राद्वारे दिली आहे.पुरस्कार जाहिर झाल्याबद्दल बाळासाहेब सोनवणे यांचे महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कल्याण महासंघाचे शिंदे प्रमोद (वि.संघटक),एम.एम. गायकवाड (जिल्हा सहसचिव),डॉ.खळगे, साहेब,प्रा.रवि आचार्य, डि.एन.गायकवाड, वाघमारे धनंजय,विष्णू मस्के,बप्पाजी कदम, गौतम जोगदंड,सोनेराव लगसकर,लोखंडे रमेश, शालन जोगदंड,भुंबे मंगल,संतोष बोबडे, शेख युनूस,पतकराव, बी.एन.गायकवाड, प्रल्हाद गडदे,ढोणे गंगाधरजी,वाघ सर, कांबळे मोहन,संभाजी गडदे,शंकर गडदे, बळीराम अकुसकर, रामराजे तोडकर,प्रविण मोरे,दादासाहेब पवार, विलास गंगणे यांच्यासह
नातेवाईक,मित्र परिवार आदींनी अभिनंदन केले आहे.