बीड जिल्हाराजकारणलेखविशेष बातमी

बीड : लेकीने घेतली बापापेक्षा जास्त मते, राष्ट्रवादीच्या जातीयवादाला दाखवला विकासाचा घाट

बीडमध्ये बाप से बेटी सवाई!

बीड : #स्ट्रेटलाईन― २३ मे ला देशातील लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला.पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपने देशात बहुमताने सर्वांत जास्त आपल्या जागा विजयी केल्या.याच दरम्यान,संपुर्ण राज्यात बहुचर्चित लढत म्हणून ओळखली जाणारी बीड लोकसभा मतदारसंघात भाजपच्या खा.डाॅ.प्रितमताई गोपीनाथ मुंडे यांनी बाजी मारली व राष्ट्रवादी काँग्रेसच्या बजरंग सोनवणेंना पराभवाचा जोरदार धक्का बसला.२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर अपघाताने डाॅ.प्रितमताई मुंडे राजकारणात दाखल झाल्या.त्यानंतर २०१९ च्या निवडणुकीत बऱ्याच लोकांना असे वाटले की अपघाताने राजकारणात आलेली मुलगी टिकणार नाही.पण बीड जिल्हातील विकास कामे आणि शांत तसेच संयमी स्वभावाचे उच्चशिक्षीत महिला नेतृत्वाचा बळावर सर्वच समाज घटकांनी केलेल्या मतदानाच्या जोरावर प्रितमताई पुन्हा एकदा १ लाख ६८ हजार ३६८ मतांनी विजयी झाल्या.

यामध्ये,प्रामुख्याने २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या विरोधात गोपीनाथ मुंडे हे १ लाख ३६ हजार एवढ्या मतांच्या लीडने विजयी झाले होते.या निवडणुकीच्या तुलनेत प्रथम सरळ सोपी व नंतर अवघड तेवढीच कठीण वाटणारी २०१९ ची निवडणुक ठरली.कारणही त्याचे तसेच आहे,विकासाच्या मुद्यावर आपण निवडणुक जिंकत नसल्याचे दिसल्यावर राष्ट्रवादी कडून सोशल मिडियावर जातीयवादाचे विष पसरवण्यास सुरूवात करण्यात आली.तर शेवटच्या टप्प्यात विधानसभेत हरलो तरी चालेल पण लोकसभेत मते द्या, 'बीड सासर असलेली मुलगीला आता आमचा शेतकरी पुत्र माहेरी पाठवणार' अशा वल्गना करण्यात आल्या.तसेच समाज आरक्षण,मोर्चे आणि दोन्ही मतदारसंघात असणारे नाव,सोनवणेच्या पत्नी वर त्यांच्याच कार्यकर्ताकडून अंतर्गत वादामधून झालेला हल्ला अशा विविध मुद्दाच्या संदर्भाने मुंडे भगिणींना ऐन निवडणुकीत टार्गेट करण्यात आले.त्यामुळे,जिल्हापुरते मर्यादित असणारे बजरंग सोनवणे हे संपुर्ण राज्याला माहिती झाले.त्यामुळे,मुंडे भगिनींना हि निवडणुक अवघड जाणार असून, विजयी लीड हे कमी होऊन अतिशय थोडक्या मतांनी प्रितमताई मुंडे ह्या विजयी होणार अशी चर्चा संपुर्ण राज्यात पाहायला मिळाली.

तर दुसरीकडे राष्ट्रवादीच्या या जातीयवादी आणि विषारी राजकारणाला भाजपने सबुरीने घेत विकासकामांचा घाट दाखवला.जिल्ह्यातील रेल्वे,रस्ते,शिक्षण,पासपोर्ट तसेच भाजपच्या विविध योजनांचा फायदा लोकांना कसा झाला हे थेट प्रितमताईच्या सोशल मिडिया टीमच्या द्वारे बीडच्या तमाम जनतेपर्यंत पोहोचवले त्यामुळे,साहजिकच बीडच्या सुशिक्षीत व सुजान नागरिकांनी जातीयवादाला फाटा देत विकासाला आपलेसे केले.कारण बीडकरांना जातीय राजकारणाचा प्रचंड द्वेष आहे.तसेच,जातीयवादाचा एवढा प्रचार होऊन देखील,प्रितमताईंनी आपले वडिल मुंडे साहेबांच्यापेक्षा २०१९ च्या निवडणुकीत ३० हजार पेक्षा जास्त मतं मिळवली आहेत.

या निवडणुकीत शिवसंग्रामचे विनायक मेटेंनी भाजपला उघड विरोध करत राष्ट्रवादी काँग्रेसला पाठिंबा दिला होता तरी बीड मधील मराठा समाजाने मुंडे साहेबांच्या २०१४ च्या निवडणुकीच्या तुलनेत ५० हजार जास्त मते ही प्रितमताईना केल्याचे समोर येत आहे.त्यामुळे,विनायक मेटेंनी स्वतः स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेत आपल्या राजकीय अस्तित्वाला सुरुंग लावला आहे.न घर का ना घाट का अशी परिस्थिती मेटेंची झाली आहे.

सांगायचा परिपाक ऐवढाच की सध्याची पिढी ही सुशिक्षीत व साक्षर आहे.प्रत्येकांच्या हातात मोबाईल आहेत.त्यामुळे,खरे काय आणि खोटे काय हे क्षणार्धात समजते.बीडच्या लोकसभा निकालावरून एकच गोष्ट स्पष्ट होते की,आगामी काळात कोणताही समाज किंवा समाज घटक जातीवादाला साथ न देता विकासाला महत्व देणार आहे.कारण आजचा समाज जातीपातीपेक्षा विकासाकामांकडे दूरदृष्टीने पाहत आहे.यामुळे प्रितमताईंवर बीड जिल्हातील तमाम जनतेनी दाखवलेला विश्वास विकास कामामध्ये उतरवून काढून राज्यात बीड जिल्हा एक विकासाचे रोल माॅडेल बनवतील यात काहीच शंका नाही.कारण मुंडे भगिनींनी रेकॉर्ड मोडीत काढत एक ऐतिहासिक विजय मिळवला आहे.

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.