सोयगाव,दि.२५:ज्ञानेश्वर धोंडू पाटील― सोयगाव शेन्दुर्नि रस्त्यावरील खड्डे बुजवीण्याचे काम सध्या सुरू आहे.वारंवार खड्डे पडणाऱ्या रस्त्यावर मजबूत काम करण्याची गरज असतांना चार की मी कामासाठी केवळ एक छोटा ड्रम डांबर वापरून थातुर मातुर पध्दतीने काम उरकले जात आहे.सार्वजनिक बांधकाम विभागाचे नियंत्रण नसल्यामुळे दरवर्षी असेच काम केले जात असल्याने पहिल्याच पाऊसात पुन्हा खड्डे जैसे थे होतात तेच यंदाही होणार असल्याचे दिसत आहे.
सोयगाव शहरासह परिसरातील नागरिकां जळगावसह उत्तर महाराष्ट्रात जाण्यासाठी शेन्दुर्नि येथे जावेच लागते पाचोरा आणि भुसावळ रेल्वेस्टेशन ला देखील याच मार्गाने जावे लागते.नातेसंबंध , व्यापार , दवाखाने ,शिक्षण आदीसाठी जळगाव सोयगावसाठी सोयीचे असल्यामुळे दररोज सोयगाव शेन्दुर्नि रस्त्यावर वाहनांची नियमित वर्दळ असते एकंदरित सात की मी च्या रस्ता सोयगाव साठी अत्यंत महत्वाचा आहे.यातील तीन की मी हा जळगाव जिल्ह्यातून म्हणजे खानदेश मधून जाणारा रस्ता नेहमीच सुस्थितीत असतो.परंतु औरंगाबाद म्हणजे मराठवाड्यातून जाणारा चार की मी रस्ता नेहमीच खराब असतो यात मोठ मोठे खड्डे पडलेले असतात.दरवर्षी खड्डे बूजले जातात तसे यंदाही हे काम सध्या सुरू आहे.परंतु काम हे जुन्या पद्धतीने सुरू आहे.चार की मी वरील खड्डे बुजविण्यासाठी केवळ एकच ड्रम डांबर वापरले जात आहे.त्यामुळे अत्यंत थातुर मातुर पद्धतीने हे काम उरकले जात असून पहिल्याच पाऊसात रस्त्यावर खड्डे पुन्हा जैसे थे होतील असे वाटत आहे त्यामुळे वाहन चालक नाराजी व्यक्त करीत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी किंवा कर्मचारी रस्त्यावर दिसत नाही त्यामुळे कामाच्या गुणवत्तेविषयी प्रश्न उपस्थित होत आहे.
0