सोयगाव,दि.२५:ज्ञानेश्वर धोंडू पाटील―घोसला ता.सोयगाव गावाजवळ बी.एस.एन.एल चा मनोरा उभारून अपूर्ण अवस्थेत बंद आढळून आला असून याकडे मात्र भारत संचार विभागाकडून माहिती देण्यात मौन बाळगण्यात येत असून सदरील मनोरा हा कागदोपत्री कार्यान्वित असल्याचे दाखविण्यात आल्याचे ग्रामस्थांकडून सांगण्यात येत आहे.यामुळे सोयगाव तालुक्यात खळबळ उडाली.
सोयगाव शहरापासून जवळच असलेल्या घोसला ता .सोयगाव गावात भारत संचार विभागाकडून दहा वर्षापूर्वी भ्रमणध्वनी मनोरा उभारण्यात आला होता,परतू या मनोऱ्याचे काम पूर्ण होवूनही या मनोऱ्याला आपटीकल फायबर केबलद्वारे जोडणी न करण्यात आल्याने केवळ जोडणी अभावी हा मनोरा उभ्या अवस्थेत बंद आहे.मात्र संबंधित विभागाकडून हा मनोरा सुरु असल्याचे भासविण्यात येर्त असून याबाबत भारत संचार विभागाकडून मात्र कोणताही दुजोरा देण्यात आलेला नसल्याने मनोऱ्या बाबत संदिग्धता वाढली आहे.या मनोरयासाठी केंद्र शासनाकडून मोठा खर्चही दाखविण्यात आलेला आहे.मनोऱ्याला सर्वच साहित्याची पुरवणी करण्यात आली असतांना केवळ जोडणी अभावी या मनोऱ्याची कार्यक्षमता बंद झालेली असून घोसला गावातील भ्रमणध्वनी ग्राहकांना मात्र पाचोरा जि,जळगाव आणि वरखेडी ता.पाचोरा या दोन मनोऱ्यांच्या कव्हरेजवर विसंबून राहावे लागत आहे.
बंद अवस्थेत मनोर्याचा घोळ मिटेना-
घोसला ता.सोयगाव गावालगत असलेल्या या मनोरयावरील एल.एन.बी कॅमेरे बंद अवस्थेत असल्याने या मनोऱ्यापासून परिसरातील ग्राहकांना कव्हरेज मिळत नसून हा मनोरा दहा वर्षापासून शोभेची वस्तू बनला आहे.याकडे मात्र संबंधित विभागाचे दुर्लक्ष झालेले असल्याचे दिसत आहे.त्यामुळे या मनोऱ्या बाबत अधिकृत कोणतीही माहिती संबंधित विभागाकडून न मिळाल्याने मनोऱ्याचा घोळ मिटता मिटेना.