औरंगाबाद जिल्हाब्रेकिंग न्युजसोयगाव तालुका

औरंगाबाद : सोयगाव परिसरात पाणीबँक प्रयोग,विहिरीत पाण्याचा साठोबा वाढविण्यासाठी शेतकऱ्यांचा कल

तालुका प्रतिनिधी | ज्ञानेश्वर धोंडू पाटील

सोयगाव दि.२६:आठवडा विशेष टीम― दुष्काळाची दाहकता आणि हवामान खात्याने दिलेला मॉन्सूनच्या उशिरा आगमनाचा इशारा यामुळे सोयगाव परिसरात शेतकऱ्यांनी स्वतःची पाणीबँक तयार करण्यासाठी विविध प्रयोग करून पावले उचलली आहे.परंतु भूगर्भातील पाणीसाठाच खोलवर असल्याने शेतकऱ्यांचे प्रयत्न निष्फळ ठरत आहे.
खरिपाच्या पेरण्यांचा कालावधी डोक्यावर आला असतांना आणि दुष्काळात अडकलेल्या शेतकऱ्यांनी स्वतःची पाणीबँक असावी यासाठी जुन्याच विहिरीत पाण्याचा साठोबा वाढविण्यासाठी खोलीकरण, विहिरीतील कुपनलिका साफ करणे आदि प्रयोग हाती घेतले असून मात्र भूगर्भातील पाणीपातळी खोलवर गेलेली असल्याने शेतकऱ्यांचे प्रयोग काही प्रमाणात यशस्वी होत आहे.परंतु यामध्ये शेतकऱ्यांना मोठा खर्चही लागत असल्याने पाण्यासाठी सोयगाव परिसरातील शेतकरी वाट्टेल ते करण्यासाठी पुढे सरसावले आहे.


Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.