सोयगाव,ता.७:ज्ञानेश्वर धोंडू पाटील―
सोयगावसह तालुक्यात बाहेरून आलेल्या ४५४५ जणांची तपासणी करून त्यांना होमकॉरंटाईन केली असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली असून सोयगाव तालुक्यात अद्याप पर्यंत एकही कोरोना पोझिटिव्ह रुग्ण आढळला नसल्याने सोयगाव तालुक्याला दिलासादायक बातमी आहे.
कोरोना संसर्गाच्या प्रादुर्भावावर सोयगाव तालुक्यात उपाय योजनांसाठी आरोग्य आणि महसूल यंत्रणांनी काटेकोरपणे उपाय योजना हाती घेतल्याने सोयगाव तालुका कोरोनाच्या धोक्यापासून दूर झालेला असून होमकॉरोटाईन केलेल्या निम्म्या जणांची पाहिल्या १४ दिवसांचा कालावधीही संपला असल्याने बाहेरून आलेली निम्मे व्यक्ती धोक्याबाहेर गेलेली आहे.लॉकडाऊन आणि संचारबंदी पाळण्यासाठी पोलीस प्रशासन कसोशीने प्रयत्न करत असतांना दुसरीकडे आरोग्य आणि महसूल विभागाची कसरत सुरु झालेली असल्याने सोयगाव तालुक्यात कोरोना नियंत्रणात आहे.एकही संशयित रुग्ण आढळला नसल्याने सोयगाव तालुक्याचे आरोग्य सदृढ असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.
कोरोनाचं नियंत्रणासाठी मह्सुक्ल विभागाकडून तहसील कार्यालयात २४ तास मदत कक्ष उभारण्यात आलेला असून आरोग्य विभागाकडून सोयगाव तालुक्याला पुरेपूर औषधसाठा उपलब्ध करून दिलेला आहे.त्यातच शहरात नगर पंचायतीच्या वतीने मोठी जनजागृती करण्यात आली असून तालुक्यात ग्राम पंचायतीचे ग्रामसेवकांनी ग्रामीण गावांची निर्जंतुकीकरण केल्याने ग्रामीण गावेही स्वच्छ झाली आहे.त्यामुळे कोरोनाच्या धोक्यापासून सोयगाव तालुका कोसो दूर झालेला आहे.पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी सुदर्शन तुपे यांनी तालुकाभर दौरे करून गाव स्वच्छतेबाबत पाहणी केली आहे.
सामाजिक अंतर पाळण्याबाबत तहसीलदार प्रवीण पांडे यांनी तालुक्यात काही गावांचे दौरे करून आरोग्य,बँक परिसर,सामाजिक ठिकाणे,आदि ठींनी सामाजिक अंतराबाबत मार्गदर्शन करून नागरिकांनी घराबाहेर न पडण्याचे आवाहन पोलीस निरीक्षक सुदाम शिरसाठ यांनी वेळोवेळी केल्याने सोयगाव तालुक्यात संचार बंदी आणि लॉकडाऊन बाबत मोठी शिस्त पाळल्या जात असल्याचे तालुका प्रशासनाने सांगितले.
अतिरिक्त कर्मचाऱ्यांना समाविष्ट-
आगामी काळात परिस्थिती धोक्याबाहेर गेल्यास सर्वच यंत्रणांचे अतिरिक्त राखीव कर्मचार्यांना आदेशित आकरण्यात आले असून कोणत्याही क्षणी आदेश आल्यास या कर्मचाऱ्यांनी मुख्यालयी निवासस्थानी सतर्क राहण्याचे या आदेशात नमूद करण्यात आले आहे.
आरोग्य विभाग आणि महसूल विभागाच्या सतर्कतेमुळे सोयगाव तालुका कोरोनाच्या कोसो दूर असून शासकीय यंत्रणांनाच श्रेय जात आहे.
सोयगाव पोलीस ठाण्याच्या वतीने शहरासह ग्रामीण भागात मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.त्यामुळे संचारबंदी आणि लॉकडाऊनला तालुक्यात कुठेही बाधा निर्माण झालेली नसल्याचे पोलीस निरीक्षक सुदाम शिरसाठ यांनी सांगितले.
महसूलच्या पुरवठा विभागाची तातडीची वाटप-
लॉकडाऊन आणि संचारबंदीच्या काळात नागरिकांची उपेमार होवू नये यासाठी तहसीलचं पुरवठा विभागाकडून तातडीने शिधापत्रिकाधारकांना धान्याचे वितरण करण्यात आले असून आतापर्यंत ७० टक्के धान्य वितरण झाले आहे.