विविध मागण्यांचे उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
अंबाजोगाई:आठवडा विशेष टीम― राज्यातील दुष्काळात शेतकर्यांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी तात्काळ उपाययोजना कराव्यात या करिता विविध मागण्यांचे निवेदन सोमवार,दि.27 मे रोजी संभाजी ब्रिगेडच्या वतीने उपजिल्हाधिकारी अंबाजोगाई यांना देण्यात आले.
संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष गोविंद पोतंगले,जिल्हा कार्याध्यक्ष प्रविण ठोंबरे यांच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात नमुद करण्यात आले आहे की,सततच्या नापिकीमुळे दुष्काळाच्या भिषण दाहकतेमुळे आणि शासकीय यंत्रणेच्या उदासिनतेमुळे शेतकर्यांच्या आत्महत्या वाढत आहेत.सध्या महाराष्ट्रात भिषण दुष्काळ पडला आहे.यामुळे शेतकर्यांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. दुष्काळ निवारण्यासाठी शेतकर्यांना सरसगट कर्जमाफी करावी, शेतकर्यांच्या शेती पंपाची विद्युत बिले माफ करावीत, शेतकर्यांच्या मुला-मुलींचे सर्व शैक्षणिक शुल्क माफ करावे, खरीप पेरणीसाठी शेतकर्यांना एकरी दहा हजार रूपये देण्यात यावे (तेलंगणा सरकारच्या धर्तीवर) ,72 हजार रिक्त पदांवर मराठा आरक्षण लागू करून नौकर भरती तात्काळ करण्यात यावी आणि आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळास 2 हजार कोटी रूपयांचा निधी वर्ग करण्यात यावा. सदर सर्व उपाययोजना व मागण्या तात्काळ पुर्ण कराव्यात अन्यथा या जनहिताच्या मागण्यासंदर्भात संपुर्ण बीड जिल्ह्यात संभाजी ब्रिगेडच्या वतीने तिव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा संभाजी ब्रिगेडच्या वतीने देण्यात आला आहे.निवेदनावर संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष गोविंद पोतंगले,जिल्हा कार्याध्यक्ष प्रविण ठोंबरे,तालुकाध्यक्ष ओमकार पतंगे,माणिक लाडेकर,नानासाहेब धुमाळ,शैलेश आपेट,दुर्गेश जाधव, संतोष पाटील,सिद्धेश्वर लंगुटे,ऋषीकेश कडभाने,ओमकार पौळ,परसराम मगर आदींच्या स्वाक्षर्या आहेत.