सोयगाव: ज्ञानेश्वर धोंडू पाटील― पळासखेडा गावात दुष्काळ च्या तीव्र झळा बसत असताना अधिकारी मात्र गायब आहे. गावातील ग्रामसेवक व तलाठी यांच्या कडून दुष्काळ परिस्थिती वर मात करण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या उपाय योजना नाही.
पळासखेडा गावात ग्रामसेवक व ग्रामपंचायत यांच्या हलगर्जी पणा मुळे दुष्काळ परिस्थितीचा सामना करावा लागत आहे गावाला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणातून अनधिकृत पणे पाणी उपसा करण्यात आला त्यामुळे त्या धरतीला पाणी साठा संपला आहे धरणातुन पाणी उपसा होत असताना ग्रामपंचायत यांच्या कडून कोणती दखल न घेतल्या मुळे आज मोठे पाणी टंचाई चे संकट उभे राहिले आहे .
आज गावातील थोडे फार पाण्याचे स्रोत आहे ते देखील संपले आहे विहिरी कोरडया झाल्या आहेत तर हात पंप तर जानेवारीत बंद झाली त्यामुळे आता ग्रामस्थांन ची मोठी कोंडी झाली आहे तरी मात्र गावात टँकर ची सोय करण्यात आलेली नाही या विषयावर ग्रामसेवक याना विचारले तर प्रस्ताव दिले है उत्तर मिळत आहे.
दुष्काळी परिस्थिती मूळे आधीच शेतीतील उत्पादन कमी झाले मंजूर वर्गाला काम नाही त्यामुळे उत्पन चे दुसरे साधन नाही असे असताना आता ग्रामस्थांना 200 लिटर पाणी 60-70 रुपये या प्रमाणे विकत घ्यावे लागत आहे त्यामुळे उन्हा सोबत खिशाला ही चटके बसत आहे.
तरी आता प्रशासन व लोकप्रतिनिधींनी सम्बंन्धी निरसन करावे व लोकांना रोजगार हमी योजनेची कामे मंजूर करून द्यावी यांवर काही तरी तोडगा काढावा अशी विनंती ग्रामस्थांन कडून केली जात आहे.