पाचोरा :ज्ञानेश्वर धोंडू पाटील― 80% समाजसेवा 20% राजकारण हे शिवसेनेचे ब्रीदवाक्य आहे.त्या अनुषंगाने पाचोरा शहर हे एक स्मार्ट सिटी भविष्यात व्हावे हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेऊन *शिवसेनेचे कार्यसम्राट आ.किशोरआप्पा पाटील यांची प्रेरणा घेऊन शिवसेनेचे पाचोरा नगरीचे लोकनियुक्त नगराध्यक्ष संजय गोहिल यांनी पाचोरा शहरातील स्वच्छता राखण्यासाठी स्वच्छता कर्मचारी यांना दैनंदिन उपयोगात पडणारी व कमी वेळेत आणि कमी खर्चात स्वच्छता राखता यावी यासाठी न.पालिका फंडातुन स्वच्छता *हात गाड्यांचे वितरण करण्यात आले.
या हात गाड्यामुळे पाचोरा शहरातील वार्डनिहायी स्वच्छता राखण्यात मदत होणार आहे.गटारी मधील घाण रस्त्यावर व रस्त्याच्या पलीकडे उघड्यावर आजपर्यंत टाकत येत होती.पण आता यानंतर या हात गाड्यांनी ती घाण कर्मचारी हे ताबडतोब हात गाडीत भरून नियोजित केलेल्या एका विशिष्ट जागेवर व ठिकाणी आता सहजरित्या घेऊन जातील अशी सोय पाचोरा न.पालिकेने केली आहे.म्हणुन आज 51हात गाड्यांचे वितरण केले गेले.
पुढील आठवड्यापासुन पावसाळा सुरू होत असुन या उघड्यावरील गटारीतल घाणींने दुर्ग॔धी व रोगराईचे प्रमाण वाढ यापुर्वी होत होती पण पाचोरा न.पालिकेचे व कर्तव्यदक्ष नगराध्यक्ष गोहिल यांचे सुक्ष्म नियोजबध्द निर्णयाने आता 100% आळा बसणार असुन आता यापुढे रोगराई व दुर्गंधी चे प्रमाण कमी होण्यास मदत स्वच्छता कर्मचारी यांना मिळणार आहे.
शहरातील नागरीकांचे आरोग्य धोक्यात येऊ नये म्हणुन तातडीने या गाड्या न.पा विशेष फंडातुन मागवुन त्वरीत वितरीत करण्यात आल्यात.या निर्णयाचे शहरात सर्व स्तरातुन कौतुक होत आहे.
यावेळी आशिर्वाद इन्फ्रा चे मुकुंदजी बिल्दीकर*उपनगराध्यक्ष शरद पाटे आरोग्य सभापती सतिष चेडे नगरसेवक आनंद पगारे व वाल्मिक पाटील बापु हटकर आरोग्य अधिकारी धनराज पाटील व प्रशासकीय अधिकारी भोसले सह न.पा कर्मचारी उपस्थित होते.